
राजापूर-अर्जूना, कोदवलींनी ओलांडली इशारा पातळी
-rat13p32.jpg
35798
ःराजापूर ः पेंडखळे येथील छप्पर उडून घराच्या इमारतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करताना सरपंच राजेश गुरव आणि सहकारी.
..
-rat13p33.jpg
L35799
ः चव्हाण कुटुंबाच्या घराचे झालेले नुकसान.
--------------
राजापूर तालुका---लोगो
........
अर्जुना, कोदवली इशारा पातळीवर
शिळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प; मच्छीमार्केट रस्ता पाण्यात
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यामध्ये संततधारेमुळे शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्यामध्ये वाढ होऊन दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नद्यांच्या वाढलेल्या पाण्याखाली मच्छीमार्केट परिसरातील रस्ता गेला आहे, तर राजापूर, शीळ, चिखलगाव रस्त्यावर पुन्हा पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या वाऱ्यामध्ये पेंडखळे येथे दोन घरांच्या छप्पराचे पूर्णत: पत्रे उडून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नद्यांचे वाढलेले पाणी हळूहळू जवाहर चौक परिसराकडे सरकू लागले आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन व्यापारीवर्ग सतर्क झाला आहे. त्यातून, त्यांनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलवण्याला सुरुवात केली आहे. राजापूर-शीळ-गोठणेदोनिवडे रस्ता पाण्याखाली गेला असून या रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.
...
चौकट
घराचे पत्रे पूर्णत: उडून गेले
या पावसामध्ये तालुक्यामध्ये पडझड झाली आहे. त्यामध्ये पेंडखळे येथील शंकर राम चव्हाण व तुकाराम राम चव्हाण यांच्या घराचे पत्रे पूर्णत: उडून गेले आहेत. प्रशासनाकडून तातडीने याची दखल घेत नुकसानीचा पंचनामाही केला आहे. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांनी तत्काळ या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असून अहवाल तहसीलदार यांना सादर केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76950 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..