सावंतवाडीत पालखी सोहळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत पालखी सोहळा उत्साहात
सावंतवाडीत पालखी सोहळा उत्साहात

सावंतवाडीत पालखी सोहळा उत्साहात

sakal_logo
By

swt1333.jpg
35815
सावंतवाडीः दीपक केसरकर यांनी आरती कार्यक्रमात सहभाग घेतला. (छायाचित्रः रुपेश हिराप)

सावंतवाडीत पालखी सोहळा उत्साहात
भाविकांची उपस्थितीः आमदार केसरकरांनी केले पादुकापूजन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ः गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मंगळवारी आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी साई पादुकांचे पूजन केले. रात्री उशिरापर्यंत पूजापाठ तसेच भजनाचा कार्यक्रम पार पडला. तर बुधवारी सकाळी केसरकर यांच्या निवासस्थानातून माडखोल येथील साई मंदिरात वाजतगाजत साई पालखी रवाना झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
आमदार केसरकर हे साईभक्त आहेत. आमदार झाल्यापासून गेली दहा-बारा वर्षे साईंची पालखी मिरवणूक दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त काढली जाते. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षातून थोडा वेळ काढून ते मंगळवारी सावंतवाडीत दाखल झाले. निवासस्थानी साई पालखीचे आगमन होताच श्री. केसरकर यांच्या हस्ते पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले. यावेळी साईभक्तांनी आमदार केसरकर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळो, असे गाऱ्हाणे घातले. तर आमदार केसरकर यांनी, माझ्या मतदारसंघातील, जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील जनतेला सुखी समाधानी ठेव, अशी प्रार्थना साईचरणी केली. त्यानंतर त्यांनी साई पादुकांची पूजा केली. उपस्थित सर्वांना साईंचा प्रसाद देण्यात आला. रात्री उशिरा आमदार केसरकर गोवा मार्गे दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले. बुधवारी सकाळी गुरुपौर्णिमा उत्सव दिनी साईंची पालखी मिरवणूक सावंतवाडीतून माडखोल येथे वाजतगाजत नेण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76954 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..