धावत्या एसटी बसवर झाड कोसळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धावत्या एसटी बसवर झाड कोसळले
धावत्या एसटी बसवर झाड कोसळले

धावत्या एसटी बसवर झाड कोसळले

sakal_logo
By

35852
एडगाव (जि. सिंधुदुर्ग) ः तळेरे-कोल्हापूर महामार्गावर येथे सुख नदीजवळ बुधवारी कोसळलेले झाड बाजूल करताना कर्मचारी.

35851
एडगाव ः तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती.

धावत्या एसटी बसवर झाड कोसळले
एडगावातील घटना; वीज वाहिन्या तुटल्या, सर्व ५० प्रवासी सुखरुप
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १३ ः विद्यार्थ्यांसह ५० प्रवासी असलेल्या धावत्या एसटी बसवर एडगावात सुखनदीजवळ आज दुपारी एकच्या सुमारास झाड कोसळले. आधी वीजवाहिन्यांवर नंतर झाड बसवर कोसळले. या दोन्ही घटनांतही सुर्दैवाने मोठा अनर्थ टळला; मात्र तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा होत्या. पोलिस आणि स्थानिकांनी झाड हटवून वाहतुक सुरळीत केली.
एस टी बस (एमएच-२० - बीएफ-१२५८) कणकवलीहून मौदेकडे निघाली होती. बसमध्ये ४० विद्यार्थ्यांसह ५० प्रवासी होते. बस सुखनदीजवळ आली असताना रस्त्याकडेला असलेले झाड सुरूवातीला वीज वाहिनीवर कोसळले. त्यानंतर अलगदपणे एसटी बसवर पडले. एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवित बस तत्काळ थांबविली आणि काही अंतर मागे घेतली. झाड कोसळल्यामुळे तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. एसटीतील प्रवाशांनी ही माहिती पोलिस, तहसील, महावितरण कार्यालयांना दिली. पोलिस निरीक्षक अमित यादव, विलास राठोड, रमेश नारनवर, राहुल पवार, नितीन खाडे, बिलपे आदी घटनास्थळी तत्काळ पोहोचले. तोपर्यत रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा होत्या. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने झाड हटविण्यास सुरूवात केली. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत झाड हटविण्यात यश आले. त्यानंतर वाहतूक सुरू झाली.


आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा
वैभववाडीपासून २०० मीटरवर एसटीवर झाड कोसळण्याची घटना घडली. मात्र, पोलिस वगळता अन्य कोणताही विभाग घटनास्थळी पोहोचलेला नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन केवळ रंगीत तालमीपुरतेच आहे का, असा सवाल विचारला जात आहे.

धोकादायक झाडे हटवा
राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गाजवळ मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. यापैकी शेकडो झाडे रस्त्यावर झुकलेली आहेत. जीर्ण झाडे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे झाडे तातडीने हटवावीत, अशी मागणी वाहनचालकांची आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77010 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..