कणकवली : गुरूवंदना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : गुरूवंदना
कणकवली : गुरूवंदना

कणकवली : गुरूवंदना

sakal_logo
By

L३५८५६

कणकवली ः येथील माहविद्यालयीन विद्य़ार्थांनी गुरूजनांना वंदन केले.
---
कणकवली महाविद्यालयात गुरूगौरव सोहळा उत्साहात साजरा

कणकवली,ता. १३ ः गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु ,गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मे श्री गुरुवे नमः असा गुरु बद्दल आदर व्यक्त केला जातो. प्रत्येकाला कुणी ना कुणी गुरु हा असतोच.माणूस हा प्रत्येक टप्प्यावर काही ना काही शिकत असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर क्षणाक्षणाला भेटणाऱ्या व्यक्तींकडून आपण काही ना काही शिकत असतो. आजच्या फोर जी, थ्री जीच्या युगातही गुरुजींचे स्थान श्रेष्ठ आहे असे प्रतिपादन कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी आज येथे केले.
कणकवली महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने गुरु गौरव हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साजरा करण्यात आला. यावेळी विचारमंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर प्रा. डॉ. सोमनाथ कदम व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. युवराज महालिंगे उपस्थित होते .
यावेळी डॉ. चौगुले प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा.डॉ. सोमनाथ कदम ,प्रा.डॉ. मारोती चव्हाण ,प्रा.दिपा तेंडोंलकर व विद्यार्थींनामधुन मयुरी राऊळ, वेदिका दुखंडे,रसिका बाईत व सुजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन प्रा.नम्रता पाटील व आभार प्रा.डॉ. बी. एल.राठोड यांनी मानले. गुरु पौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन आर्शिवाद घेतले.

भालचंद्र महाराज मठात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
शहरातील भालचंद्र महाराज संस्थानाच्यावतीन मठाक आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवानिमित्त भालचंद्र महाराज संस्थानात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. भालचंद्र महाराज संस्थानाच्यावतीने आज पहाटे समाधी पूजन, त्यांनतर काकड आरती, भक्त गणांच्यावतीने पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. दुपारी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संगीत भजने सादर करुन वातावरण भक्तीमय झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77018 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..