वडगाव-शेरी विधानसभा कोकण आघाडी अध्यक्षपदी वैभव राऊळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव-शेरी विधानसभा कोकण आघाडी अध्यक्षपदी वैभव राऊळ
वडगाव-शेरी विधानसभा कोकण आघाडी अध्यक्षपदी वैभव राऊळ

वडगाव-शेरी विधानसभा कोकण आघाडी अध्यक्षपदी वैभव राऊळ

sakal_logo
By

swt1340.jpg
35868
पुणेः वैभव राऊळ यांना शुभेच्छा देताना माजी आमदार जगदीश मुळीक, संतोष खांदवे.

वडगाव-शेरी विधानसभा कोकण
आघाडी अध्यक्षपदी वैभव राऊळ
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. १३ः भाजपचे सावंतवाडी तालुका आंबोली मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष आणि आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव राऊळ यांची पुणे येथील वडगाव-शेरी विधानसभा मतदार संघ कोकण आघाडी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. माजी आमदार आणि पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि वडगाव शेरी अध्यक्ष संतोष खांदवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री. राऊळ हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, आंबोली परिसरात देखील त्यांचे कार्य आहे. क्रिकेट स्पर्धा, सामाजिक कार्य असो किंवा मदत असो, ते नेहमीच सक्रिय पुढाकार घेतात. त्यामुळे अनेकांचा आशीर्वाद या युवकाने अल्पावधीत मिळविला आहे. श्री. राऊळ हे मूळचे सांगेली येथील असले तरी बालपणापासून ते आंबोलीवासीय आहेत. केसरी टूर्समध्येही त्यांनी काही वर्षे काम केले. सामाजिक कार्याची आवड आणि गोरगरिबांची सेवा करून समाजात चांगले काहीतरी करण्याच्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेतला आणि अल्पावधीतच आंबोली, चौकुळ, गेळे येथील लोकांचे जवळचे एक सामाजिक नेतृत्व झाले. राजकारणातही ते सक्रिय झाले. तालुकाध्यक्ष संदीप गावडे यांचे ते निकटवर्तीय आणि डोंबिवलीचे आमदार माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांना सावंतवाडी आंबोली मंडळ भाजप युवा मोर्चा अध्यक्षपद दिलेले असून, आता पुणे येथील वडगाव-शेरी विधान सभा कोकण आघाडी अध्यक्षपदी निवड केली आहे. याबद्दल त्यांचे पुणे तसेच आंबोली पंचक्रोशीमधून अभिनंदन करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77032 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..