
रत्नागिरी ः जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज प्रशालेत आषाढीनिमित्त उत्साहात दिंडी सोहळा
-rat11p36.jpg
35520
- रत्नागिरी ः क्षेत्र नाणीजधाम येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इंस्टिट्यूट प्रशालेच्या मुलांनी रविवारी आषाढी एकादशीनिमित्त काढलेली दिंडी.
-----------------
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज प्रशालेत दिंडी
प्रत्यक्ष विठुरायाचेच दर्शन; विविध स्पर्धाही उत्साहात
रत्नागिरी, ता. १२ ः श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, प्रशालेत आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात झाला. येथील चिमुकल्यांच्या रूपात प्रत्यक्ष विठूरायाचेच दर्शन घडल्याची भावना या वेळी सर्वांच्या मनात होती.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका गायत्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सोहळ्याला संस्थानच्या दक्षिणपाठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज, ओेश्वरीताई, संस्थानचे विश्वस्त शांताराम दर्डी, कीर्तीकुमार भोसले, मुख्याध्यापिका गायत्री राठोड, शिक्षक, भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात प्रतिमापूजन व सरस्वतीस्तवनाने झाली. सहाय्यक शिक्षक सौरभ कनावेज यांनी बासरीवर ''ओंकार स्वरूपा'' हे गीत सादर केले. पालखीतील विठुरायाची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा केली. दिंडीसाठी शाळेतील लहान बालके वेगवेगळ्या संतांच्या व विठ्ठल-रुक्मिणीच्या रूपात सजली होती. त्यांच्या सहभागाने विठुरायाच्या गजरात प्रशालेपासून दिंडी सुरू झाली. दिंडी मुख्य मंदिरापुढे पालखी आल्यावर ज्युनिअर केजीच्या मुलांनी सुंदर नृत्य सादर केले. या वेळी रिंगण, फुगडी आदी कार्यक्रम झाले. या निमित्त विठुरायावरील अभंग स्पर्धांचे आयोजन केले. सहाय्यक शिक्षिका वृषाली भोगटे यांनी ''विठू माऊली तू'' हा अभंग सादर केला. त्यानंतर भूमिका शिंदे हिने विठ्ठल व पुंडलिक भेटीवरील कीर्तन तर संत गोरा कुंभार यांच्या जीवनातील प्रसंग सर्वज्ञ पाटोळे, जानवे पाटोळे व सत्वशील गुरव यांनी सादर केला. या निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कोरोना काळातील वारकऱ्यांच्या मनाची व्यथा सांगणारी कविता सहाय्यक शिक्षक माने यांनी सादर केली. यानंतर कानिफनाथ महाराज, ओेश्वरीताई, शांताराम दरडी यांनी मनोगत व्यक्त केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77050 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..