रत्नागिरी- प्राध्यापकांच्या मुलाखतींचे चित्रीकरण व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- प्राध्यापकांच्या मुलाखतींचे चित्रीकरण व्हावे
रत्नागिरी- प्राध्यापकांच्या मुलाखतींचे चित्रीकरण व्हावे

रत्नागिरी- प्राध्यापकांच्या मुलाखतींचे चित्रीकरण व्हावे

sakal_logo
By

35970ः संग्रहीत
....
प्राध्यापक मुलाखतींचे चित्रीकरण व्हावे

धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काकडे; कोणत्याही सबबीखाली डावलता येणार नाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः महाराष्ट्र शासनाने महाविद्यालये तसेच स्वायत्त उच्च संस्थांसाठी सहायक प्राध्यापक पदासाठी पदभरती प्रक्रिया सुरू केली आहे; परंतु काही वेळा उमेदवारांवर अन्याय होतो. ज्या मागास प्रवर्गांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, असे उमेदवार खुल्या प्रवर्गातील जागेसाठी अर्ज करतात; मात्र केवळ त्या जातीचे असल्यामुळे अशा उमेदवारांची मुलाखत चांगली होऊनदेखील निवड होत नाही. निवडप्रक्रियेत कोणत्या ना कोणत्या सबबीखाली डावलले जाते. त्यामुळे मुलाखतीचे चित्रीकरण व्हावे, अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केली आहे.
त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सध्याचे सामाजिक वातावरण लक्षात घेता बऱ्याच अंशी समाज जातीजातींमध्ये विभागला गेला आहे. जातीय ध्रुवीकरणाचा परिणाम विविध सामाजिक स्तरावर स्पष्टपणे दिसून येतो. जातीभेद निर्मूलन हे आपल्या राष्ट्रकर्त्यांचे प्रथम स्वप्न होते आणि ते सत्यात उतरवण्यासाठी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पुढारी यांनी जातीय गटबाजीपासून अलिप्त राहत महाराष्ट्रातील जातीय सलोखा अभेद्य राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. सर्वसमावेशक योजना, सर्वसमावेशक सामाजिक कार्यक्रम, सर्वसमावेशक न्यायप्रक्रिया, समान संधी, समान वागणूक आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वसमावेशक निवडप्रक्रिया या माध्यमातून महाराष्ट्राची जडणघडण व्हावी. सर्वसमावेशक निवड प्रक्रिया हा सुद्धा याच समाजाच्या विकासाचा भाग आहे. प्राध्यापक निवडीसाठी मुलाखतीवेळी निवडप्रक्रियेत कोणत्या ना कोणत्या सबबीखाली उमेदवारांची निवड डावलली जाते.
...
चौकट
तक्रारींचे निराकरण करणे सहज शक्य
एकतर संपर्कातील किंवा मुलाखतकर्त्यांच्या जातीतील उमेदवाराची निवड जाणीवपूर्वक केली जाते. गुणवत्ता नाकारली जाते. अनेकदा तक्रार करूनही अशा उमेदवारांना न्याय मिळत नाही. कारण, या प्रक्रियेत मुलाखत कशी झाली, याबाबत कोणताही पुरावा या उमेदवारांना सादर करता येत नाही. जर या मुलाखतींचे चित्रीकरण झाले तर अशा प्रकारे येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करणे सहज शक्य होईल. म्हणून यापुढे सर्व मुलाखतींचे चित्रीकरण व्हावे, अशी मागणी काकडे यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77150 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top