
शिडवणे शाळेत गुरुपौर्णिमा
35931
शिडवणे ः येथील शाळेत साजरी झालेली गुरुपौर्णिमा.
शिडवणे शाळेत गुरुपौर्णिमा
तळेरे ः नेहमी आपल्या गुरुंचा आदर, सन्मान करा. त्यांनी दिलेली अनमोल शिकवण आचरणात आणा, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी केले. जिल्हा परिषद शाळा शिडवणे क्रमांक १ शाळेत आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात ते बोलत होते. त्यानिमित्ताने शाळेतील मुलांनी आपल्या गुरुंना वंदन केले. यावेळी अथर्व कुडतरकर, वेदांत कुडतरकर, नीतेश पाटणकर, फरान शेख, शफा शेख, फरीन शेख, श्रेया पाळेकर या मुलांनी आपल्या भाषणातून शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. उपस्थित सर्व मुलांनी केंद्रप्रमुख कुबल व गुरुजनांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन साष्टांग नमस्कार केला. पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल, उपशिक्षिका सुजाता कुडतरकर यांनी मनोगते व्यक्त केली.
............
35932
माणगाव ः संजय कात्रेंचा सन्मान करताना मान्यवर.
माणगाव वाचनालयात गुरुपौर्णिमा
माणगाव ः श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय, माणगाव येथे गुरुपौर्णिमा साजरी झाली. गुरुंच्या स्थानी माणगाव हायस्कूलचे माजी शिक्षक संजय कात्रे होते. तर शिष्य म्हणून माणगाव केंद्रातून दहावीत प्रथम आलेली सिद्धी बोभाटे, बारावी विज्ञान प्रथम मंदार भिसे, बारावी वाणिज्य धनश्री मुंज, बारावी कला रामचंद्र पारधी, बारावी इलेक्ट्रीकल सदाशिव महाडेश्वर, बारावी ऑफिस मॅनेजमेंट पंकज राणे आदींचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष परशुराम चव्हाण यांनी श्री. कात्रे यांचा तसेच साक्षी काणेकर, गौरेश सरमळकर या सातवीतील मुलांचाही गौरव केला. वाचनालयाचे सचिव एकनाथ केसरकर यांचाही सन्मान झाला. चिठ्ठीद्वारे काढलेल्या वाचक भांग्याकामध्ये नियती पंडित, शिवराम पालव व बालवाचक म्हणून वेदिका पिळणकर यांची चिठ्ठी आली. स्नेहल फणसळकर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. केसरकर यांनी प्रास्ताविक केले. चव्हाण यांनी आभार मानले. संजय कात्रे व सुहास सावंत यांनी देणगी दिली. विजय पालकर, शाम पावस्कर, दादा कोरगावकर, विजय केसरकर उपस्थित होते.
..............
35933
मालवण ः निवृत्त शिक्षकांच्या सत्कारप्रसंगी मान्यवर.
मालवणात निवृत्त शिक्षकांचा सत्कार
मालवण ः येथील रोटरी क्लबच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील विविध प्रशालांच्या चार सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यात रिटा पिंटो, अंजली पिंटो, संजय जोशी, प्रज्ञा सावजी या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष रतन पांगे, सेक्रेटरी अभय कदम, खजिनदार रमाकांत वाक्कर, डॉ. अजित लिमये, उमेश सांगोडकर, सुहास ओरसकर, ॲड. सोनल पालव, संजय गावडे, रंजन तांबे, ऋषिकेश पेणकर आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77194 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..