''मोडी''च्या संगोपनासाठी पुढाकार घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''मोडी''च्या संगोपनासाठी पुढाकार घ्या
''मोडी''च्या संगोपनासाठी पुढाकार घ्या

''मोडी''च्या संगोपनासाठी पुढाकार घ्या

sakal_logo
By

L३५९१८

दादर ः मोडी लिपी प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना अभ्यासक पंकज भोसले. सोबत रणजीत सावरकर, सुनील पवार, सुधीर थोरात आदी.

''मोडी''च्या संगोपनासाठी पुढाकार घ्या
सुनील पवार ः दादर येथे मोडी लिपी प्रशिक्षणाचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः एकीकडे जिथे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून चळवळ सूरू आहे, तिथेच मराठी भाषेची दुसरी लिपी असलेल्या मोडी लिपीचे जतन, संवर्धन व प्रसार, प्रचार होण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यासकांनी पुढाकार घेऊन इतिहासाचा हा अमूल्य ठेवा जतन करावा, असे प्रतिपादन शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिति यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील सावरकर राष्ट्रीय स्मारकात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ गुरुपौर्णिमादिनी काल (ता. १३) सायंकाळी करण्यात आली. यावेळी स्मारकाचे अध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे प्रमुख कार्यवाह श्री. सुधीर थोरात मोडी लिपीचे अभ्यासक व प्रशिक्षक श्री. सुनील कदम, पंकज भोसले आदी पदाधिकारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, "या प्रशिक्षण वर्गाचा उद्देश फक्त मोडी लिपी प्रशिक्षण नसून, त्यातून संशोधक आणि अभ्यासक निर्माण करण्याकडे जास्त भर दिला जाणार आहे. आजही बराचसा इतिहास मोडी पत्रांच्या माध्यमातून जाणता येतो. हा सर्व इतिहास मोडी लिपीमध्ये असल्यामुळे त्यापासून आपण अनभिज्ञ आहोत. शिवपूर्व काळ, शिवकाळ तसेच पेशवेकाळातील बरेचसे कागद आज देखील लिप्यांतराविना पडलेले आहेत. हे कागद विविध पुराभिलेख विभागातून आणून त्यावर अभ्यास व संशोधन करण्याचा मानस या दोन संस्थांचा आहे."
स्मारकाचे अध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांनी स्मारकातर्फे घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत केले . श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे प्रमुख कार्यवाह श्री. सुधीर थोरात यांनी मोडी लिपीची गरज विषद केली. ''पावनखिंडीचा रणसंग्राम'' या विषयावर शिवव्याख्याते प्रतीक पाटणकर यांचे व्याख्यान झाले.
.............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77197 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..