राजापूर-अणुस्कुरा घाटातील वाहतूक दोन तासात सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-अणुस्कुरा घाटातील वाहतूक दोन तासात सुरळीत
राजापूर-अणुस्कुरा घाटातील वाहतूक दोन तासात सुरळीत

राजापूर-अणुस्कुरा घाटातील वाहतूक दोन तासात सुरळीत

sakal_logo
By

अणुस्कुरा घाटः लोगो
....
-rat१४p३७.jpg
३६०१०
राजापूर ः घाटामध्ये पडलेली दरडीची माती काढण्याचे सुरू असलेले काम.
...
-rat१४p३८.jpg
L३६०११
मोकळा झालेला घाटरस्ता.
-------------
दोन तासांत दरड बाजूला, रस्ता वाहतूकीला खुला

एकेरी मार्ग सुरू; बांधकामकडून त्वरित कार्यवाही, दुहेरी वाहतूक लवकरचः अभियंता बावधनकर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ ः पश्‍चिम महाराष्ट्राला कोकण परिसराला जोडणाऱ्‍या तालुक्यातील अणुस्कुरा घाटामध्ये बुधवारी (ता. १३) रात्री दरड कोसळली. त्यामुळे काही काळ या मार्गातील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड कोसळल्याचे कळल्यापासून अवघ्या दीड-दोन तासामध्ये जेसीबीच्या मदतीने रस्त्यावर कोसळलेली माती अन् दगड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. त्यामुळे सद्यःस्थितीमध्ये अणुस्कुरा घाटातून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.
तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पश्‍चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्‍या तालुक्यातील अणुस्कुरा घाटामध्ये रात्री उशिरा दरड कोसळण्याचा प्रकार घडला. त्यामध्ये रस्त्यामध्ये माती आणि दगड असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्या ठिकाणी मोठ्या वळणाचा अन् अरुंद रस्ता असल्याने तातडीने रस्त्यामध्ये पडलेली माती बाजूला करणे गरजेचे होते. दरम्यान, घाटमार्गामध्ये दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे समजताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यामध्ये पडलेली दरडीची माती अन् दगड बाजूला करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या. त्यानंतर या रस्त्यावरील एकेरी वाहतूक सुरू झाली होती. ज्या ठिकाणी दरड कोसळली, तो भाग नागमोड्या वळणांचा असून त्यांच्या खालच्या बाजूलाही मोठे वळण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यामध्ये पडलेली माती तेथून उचलून लांब नेऊन अन्यत्र टाकावी लागणार आहे. ती टाकल्यानंतर रस्त्यावरील दुहेरी वाहतूक सुरू होणार असून त्याबाबतची कार्यवाही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील बावधनकर यांनी दिली.
----------------
चौकट
..तरीही बावधनकर स्पॉटवर
पावसाळ्यातील अतिवृष्टीच्या काळामध्ये गतवर्षी आंबाघाटातील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी केवळ एकमेव पर्यायी मार्ग म्हणून अणुस्कुरा घाटाला महत्व प्राप्त झाले होते. गतवर्षीही या घाटामध्ये दरडी कोसळण्याचे प्रकार घडले होते; मात्र, काही तासामध्ये ही माती आणि दगडी तातडीने बाजूला करून वाहतूक सुरू करण्याची महत्वाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दुधाडे, कनिष्ठ अभियंता कुळकर्णी, स्वप्नील बावधनकर आणि सहकाऱ्‍यांनी यशस्वीरित्या सांभाळली. आजही तब्येत बरी नसताना बावधनकर यांनी स्वतःची जबाबदारी ओळखून घरातून सहकाऱ्‍यांना सकाळपासून मार्गदर्शन करून घाटरस्ता दोन तासामध्ये मोकळा करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.
..
एक नजर...
घाटामध्ये रात्री उशिरा दरड कोसळण्याचा प्रकार
माती आणि दगड असल्याने वाहतूक ठप्प
बांधकाम विभाग तातडीने घटनास्थळी पोचला
दरडीची माती अन् दगड बाजूला केली
या रस्त्यावरील एकेरी वाहतूक सुरू झाली

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77207 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top