
संगमेश्वर ः महावितरण आणि ठेकेदार यांचा नाही मेळ
फोटो ओळी
-rat14p11.jpg ःKOP22L35938
संगमेश्वर ः गावमळ्यातील महामार्गाशेजारी असलेला धोकादायक खांब.
-----------
महावितरणचे खांब
धोकादायक स्थितीत
संगमेश्वर, ता. १४ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक ओझरखोल आणि गावमळा येथे रस्ता चौपदरीकरणाच्या ठेकेदाराने डोंगर कटाई करून ठेवलेली आहे. त्यावर महावितरणचे खांब धोकादायक आहेत. कटाई केलेल्या डोंगरावरचे खांब केव्हाही पडू शकतात. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हे काम हायवे चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराचे असल्याचे सांगून त्या ठेकेदाराला पत्र पाठवल्याचे सांगितले. संबंधित ठेकेदाराला वारंवार आठवण करूनही याकडे लक्ष दिले जात नसल्याचे महावितरणने सांगितले. संगमेश्वरनजीकच्या गावमळ्यातील पोलाशेजारी भलीमोठी दरड खाली आली आहे. तेथील पोलवरून लाईन हायवे क्रॉस केलेली आहे. तो पोल खाली आल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे याकडे कोण लक्ष देणार की नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77261 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..