
वेंगुर्ले बसस्थानकातील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट
L३६०६५
सावंतवाडी ः चुकीच्या पध्दतीचे काम रोखून एसटीच्या कनिष्ठ अभियंता गिराजा पाटील यांचे लक्ष वेधताना सुरेश भोगटे व अन्य. (छायाचित्र ः रुपेश हिराप)
वेंगुर्ले बसस्थानकातील खड्डे
बुजवण्याचे काम निकृष्ट
सुरेश भोगटे आक्रमक ः समस्या तत्काळ मिटवण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः आधीच चिखलाचे साम्राज्य झालेल्या येथील वेंगुर्ले बसस्थानक परिसरातील खड्ड्यात पुन्हा एकदा माती टाकून ते बुजवण्याचे काम राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून रोखण्यात आले. खड्ड्यात माती नको तर खडी टाकून ते खड्डे बुजवा,
अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे व पदाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाचे कनिष्ठ अभियंता गिरिजा पाटील यांच्याकडे केली.
येथील बस स्थानकाच्या नविन इमारतीचे काम सुरु आहे. मात्र, अस्तित्वात असलेल्या जुन्या इमारतीत व परिसरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली आहे तसेच खड्ड्यांमुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दुसरीकडे स्वच्छतागृहातही घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने चार दिवसापूर्वी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्यावतीने आगार व्यवस्थापकाला धारेवर धरले होते. स्थानक परिसरातील समस्या येत्या आठ दिवसात मिटवा, असा इशाराही दिला होता. याच पार्श्वभूमीवर आज येथील वेंगुर्ले बस स्थानक परिसरात पडलेले खड्डे माती टाकून बुजविण्यात येत असल्याचा प्रकार श्री. भोगटे, रवी जाधव यांच्या निदर्शनास आला. त्यांनी या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्या ठिकाणी जाऊन हे काम बंद पाडले. माती टाकून खड्डे बुजविल्यास मुसळधार पावसात त्या ठिकाणी आणखीनच चिखल होणार आहे. त्याचा कोणताच फायदा होणार नाही. उलट कामासाठी घातलेले प्रशासनाचे पैसे नाहक वाया जातील. त्यामुळे माती नको तर खडी टाकून ते खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी करत सुरु असलेले काम रोखले. तसेच येत्या दोन दिवसात संपूर्ण बस स्थानक परिसर स्वच्छ करावा, स्वच्छतागृहाची दुरावस्था सुधारावी, अन्यथा आक्रमक पवित्रा हाती घेऊ, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, हा प्रकार सावंतवाडीत आलेल्या एसटी महामंडळाच्या कनिष्ठ अभियंता पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्यांनी खडी टाकून खड्डे बुजविण्यात येतील, अशी ग्वाही उपस्थितांना दिली. यावेळी विजय पवार, संजय साळगावकर उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77264 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..