सुकळवाड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुकळवाड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
सुकळवाड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

सुकळवाड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

sakal_logo
By

swt1433.jpg
36072
सुकळवाडः येथे मोरीवरील रस्त्यावरील खड्डे धोकादायक ठरत आहेत.

सुकळवाड रस्त्यावर
खड्ड्यांचे साम्राज्य
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १४ः कसाल-मालवण रस्त्यावरील सुकळवाड येथील नव्याने बांधण्यात अलेल्या मोरीवरील खड्डे अपघाताला आमंत्रण ठरत आहेत. प्रशासन याकडे लक्ष देईल का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून आणि वाहन चालकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.
कसाल-मालवण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा सुरू असते. या मार्गावरील सुकळवाड-रानबांबुळी दरम्यान दोन महिन्यापूर्वी नव्याने काजवे उभारण्यात आला. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काम पूर्ण झाल्याने या कॉलेजवर माती, खडी टाकून रोलिंग करण्यात आले; परंतु वाहनांची मोठ्या प्रमाणात असलेली वर्दळ आणि जोरदार पडणारा पाऊस यामुळे या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. हे धोकादायक खड्डे वाहनचालकांना डोकेदुखी ठरत असून, अपघातांना निमंत्रण ठरत आहेत. खड्डे बुजविण्याक़डे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालकातूंन नाराजी व्यक्त होत आहे. पर्यटन दृष्ट्या मोठी रहदारी असलेल्या या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77268 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..