
रत्नागिरी-गोकुळाष्टमीनिमित्त विविध क्रीडा स्पर्धा
राधाकृष्ण मंदिर संस्थेतर्फे
गोकुळाष्टमीस क्रीडा स्पर्धा
रत्नागिरी, ता. १४ : रत्नागिरी राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेतर्फे गोकुळाष्टमीनिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये ६, ७ ऑगस्टला जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा घेण्यात येणार आहेत. १२ व १३ ऑगस्टला खुल्या टेबल टेनिस तर १४ ऑगस्टला जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा उंचीच्या गटानुसार जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेमार्फत घेण्यात येणार आहेत, अशी माहिती राधाकृष्ण वैश्य मंदिराचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष विरेंद्र वणजू यांनी दिली.
राधाकृष्ण वैश्य मंदिरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होत. या वेळी सेक्रेटरी मकरंद खातू, वैश्य युवाचे शरीरसौष्ठव स्पर्धा प्रमुख कुंतल खातू, कॅरम असोसिएशनचे विवेक देसाई, अनिल चन्ने आदी उपस्थित होते. १२, १३ ऑगस्टला खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये १८ वर्षावरील व १८ वर्षाखालील पुरुष, अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये विजेता व उपविजेता अशी बक्षीसे असणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजेश रेडीज यांच्याशी संपर्क साधावा. १४ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा उंचीच्या गटानुसार होतील. स्पर्धेत उंचीनुसार चार गट असून प्रत्येक गटात पाच रोख पारितोषिके व पाच मानचिन्हे असणार आहेत. या गटात गृपविनर मधून "राधाकृष्ण श्री २०२२" हा किताब विजेता निवडला जाणार आहे. याला रोख ११ हजार रुपये व आकर्षक सन्मानचिन्ह व मानाचा पट्टा देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या माहितीसाठी हौशी जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष सदानंद जोशी, सेक्रेटरी शैलेश जाधव यांच्याशी संपर्क साधावा.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77286 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..