खेड- खेडमध्ये पावसामुळे दोन लाखांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड- खेडमध्ये पावसामुळे दोन लाखांचे नुकसान
खेड- खेडमध्ये पावसामुळे दोन लाखांचे नुकसान

खेड- खेडमध्ये पावसामुळे दोन लाखांचे नुकसान

sakal_logo
By

एसीपी योगा कॉलेजमध्ये पदवीदान
खेड ः येथील ऑल इंडिया कौन्सिल फॉर प्रोफेशनल एक्सलन्स या योगा कॉलेजमधून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ नुकताच झाला. या कार्यक्रमात योगगुरू विश्वेश चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्ष योग शिकून डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक बहाल करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरळचे मुख्याध्यापक डॉ. सय्यद अली, दापोलीतील संस्कृत व योगशिक्षक विश्वास फाटक, योग अध्यापिका सुनीता जोशी, स्मिता वैद्य, अ‍ॅड. हेमंत वडके, श्रीराम सनये, अजय निगडेकर उपस्थित होते. संगीत विशारद प्रतीक्षा कांबळे यांनी स्वागतगीत व भक्तिगीते गायन केले. या वेळी एसीपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे मनोरे रचून प्रत्यक्षिक सादर केले. या वेळी योग डिप्लोमा उत्तीर्ण प्रियांका जाधव, मकरंद सकपाळ, माधुरी माळी, सरस्वती नंदवंशी, मीनल इनरकर या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, मेडल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. एसीपी कॉलेजचे योगगुरू विश्वेश चिखले यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
-------------
विद्याभारतीमध्ये गुरूपौर्णिमा
दाभोळ ः दापोली शिक्षणसंस्था संचलित विद्याभारती प्राथमिक विभागात चैतन्य सभागृहात गुरूपूजा व मातृ-पितृपूजा करून गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात दीपपूजा, दीपमंत्र व गुरूमंत्राने झाली. अस्मिता भांबीड यांनी प्रास्ताविकातून गुरूपौर्णिमा साजरी करण्याचा उद्देश विषद केला त्यानंतर रमेश नवरत यांनी गोष्टीरूपाने गुरूचे आपल्या जीवनातील महत्व मुलांना पटवून दिले. संध्या रेवाळे यांनी मातृ-पितृप्रती असलेला आदर गाण्यातून व्यक्त केला. त्यानंतर मुलांनी विधीव्रत आपल्या आई-बाबांचे पूजन केले. या निमित्ताने पर्यावरण, निसर्ग, पशुपक्षी, पुस्तके, इंटरनेट, संगणक, शाळा, शिक्षक, अशा सर्व सजीव-निर्जीव गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करू, अशी ग्वाही दिली. पालक मनोगतातून शाळेने केलेल्या स्तुत्य उपक्रमाबाबत शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले. हा कार्यक्रम सजावटीसाठी अभिषेक बुरटे, मनिषा मेहता व व कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले.
------------
सुवर्णपदक पटकावल्याबद्दल
मोरेंचा सत्कार
चिपळूण ः बेंगलोर येथे झालेल्या ''भारत श्री'' शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून बाजी मारणाऱ्या समीर मोरे यांचे आमदार भास्कर जाधव यांनी अभिनंदन केले. मोरे हे चिपळूण तालुक्यातील शिरळ या गावचे आहेत. माझ्या मतदार संघातील एका खेळाडूने उत्तुंग यश मिळवले याचा मला सार्थ अभिमान आहे, असे उद्गार त्यांनी या वेळी काढले. मोरे यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देताना सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले. या वेळी मोरे यांचे मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय खेळाडू नंदकिशोर शिंदे, विनोद झगडे, फैसल कास्कर, शिरळचे उपसरपंच फैयाज शिरळकर, रूपेश शेलार, हेमंत मोरे, श्रीरामभाऊ घाग, सुनील तांबडे, गौरव पाटेकर आदी उपस्थित होते.
--------------
असुर्डे हायस्कूलमध्ये गुरूपौर्णिमा साजरी
चिपळूण ः आंबतखोल येथील वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती चिपळूण, शिक्षणविस्तार अधिकारी सशाली मोहिते तसेच असुर्डे आंबतखोल केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रद्धा विचारे, विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम फुटक उपस्थित होते. प्रकाश शिर्के, सुरभी मोहिरे या शिक्षकांनी तसेच विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77306 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..