
रत्नागिरी ः प्रतिसाद देणारे स्वयंसेवक निर्माण करण्याची गरज
- rat14p48.jpg
36063
ः रत्नागिरी ः मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना शिक्षक.
--------------
प्रतिसाद देणारे स्वयंसेवक
निर्माण करण्याची गरजः म्हात्रे
रत्नागिरी, ता. १४ ः समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत नागरी संरक्षण, आपत्ती आणि त्याबद्दलच्या व्यवस्थापनाची माहिती पोहोचल्यास आपत्तीची तीव्रता कमी होणे, आपत्तीमुळे होणारे जीवित व वित्तहानी कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होते. याकरिता समाजात प्रथम प्रतिसाद देणारे स्वयंसेवक जागोजागी निर्माण करण्याची गरज आहे. याच उद्देशाने हा प्रशिक्षणवर्ग आयोजित केल्याचे नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक एम. के. म्हात्रे यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात नव्यानेच स्थापन झालेल्या नागरी संरक्षण केंद्रातर्फे नागरी संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात झाला. या वेळी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे, मत्स्यसंपत्ती अर्थशास्त्र आणि विस्तार शिक्षणविभाग प्रमुख डॉ. केतन चौधरी, मत्स्यसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश नाईक, नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक म्हात्रे, सुनील मगदे उपस्थित होते. यामध्ये मत्स्य महाविद्यालयातील ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77321 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..