कणकवली :लॅब मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :लॅब मंजूर
कणकवली :लॅब मंजूर

कणकवली :लॅब मंजूर

sakal_logo
By

कनेडी हायस्कूलला
प्रयोगशाळा मंजूर
कनेडी,ता. १४ ः येथील माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेसाठी केंद्र शासनाकडून अटल टींकरिंग लॅब मंजूर झाली. जिल्ह्यात यापूर्वी चार शाळांना अशी प्रयोगशाला मंजूर झाली होती. यंदाच्या आर्थिक वर्षांमध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे प्रयोगशाळा मंजूर झाली. यासाठी १२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. प्रशालेतील सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून ही प्रयोगशाळा बनविली आहे. विद्यार्थ्यांची कल्पना आणि कौशल्य या प्रयोगशाळेमध्ये सिद्ध केले जाणार आहे. विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग आणि गणित क्षेत्रातील कौशल्य विद्यार्थ्यांना मांडता येणार आहे. या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. राष्ट्रीयस्तरावरील वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रदर्शनांमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेऊन प्रकल्प मांडता येणार आहे. विद्यार्थी दशेमध्ये कौशल्य विकसित होण्यासाठी आयआयटीच्या धर्तीवर या प्रयोगशाळा निर्माण केल्या आहेत. या प्रयोगशाळेत ड्रोन तंत्रज्ञान, सेंसर तंत्रज्ञान, वैमानिक तंत्रज्ञान आणि नासाच्या धर्तीवर प्रयोग करण्याची संधी येथे मिळाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77328 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..