कुडाळ शिक्षक पतसंस्थेची निवडणूक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ शिक्षक पतसंस्थेची निवडणूक जाहीर
कुडाळ शिक्षक पतसंस्थेची निवडणूक जाहीर

कुडाळ शिक्षक पतसंस्थेची निवडणूक जाहीर

sakal_logo
By

कुडाळ शिक्षक पतसंस्थेची निवडणूक जाहीर
कणकवलीः कुडाळ तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित कुडाळ या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणूकीसाठी १६ जुलैला सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालयात मतदान केंद्र आहे. मतदानानंतर साडेचार वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
---
आरोग्य कर्मचारी पतसंस्थेची सभा
कणकवलीः सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या संस्थेची वार्षिक सभा १७ जुलैला सकाळी दहा वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित केली आहे. या सभेला सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने केले आहे.
----
कणकवलीत सेवानिवृत्तीधारकांची आज सभा
कणकवलीः तालुका पेन्शनर असोसिएशनची मासिक सभा उद्या (ता. १५) सायंकाळी चार वाजता आयोजित केली आहे. कलमठ येथील संस्थेच्या कार्यालयात ही सभा होणार आहे. सभेमध्ये विविध विषयावर चर्चा होणार असून यावेळी माधुरी महेंद्र प्रतिष्ठानच्या अभ्यासिकाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष दादा कुडतरकर, सचिव व्ही. के. चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77329 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..