
वझरेसाठी विकास निविदा जाहीर
वझरेसाठी विकास निविदा जाहीर
कणकवली ः वझरे (ता.दोडामार्ग) ग्रामपंचायतीतर्फे विकास निविदा जाहीर करण्यात आली. त्यासाठी मान्यता प्राप्त ठेकेदारांना सुट्टीचे दिवस वगळून दर पत्रक शील बंद लखोट्यांमध्ये सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. हळदीचागुंडा घोडग्याचीवाडी गिरोडे शाळेसाठी संगणक व प्रिंटर पुरवणे अंदाजपत्रकीय रक्कम एक लाख ३५ हजार, ग्रामपंचायतीसाठी लॅपटॉप पुरविणे ४३ हजार, ग्रामपंचायती अंतर्गत अंगणवाड्यांना खुर्च्या पुरवणी २० हजार, हळदीचागुंडा अंगणवाडीला लोखंडी कपाट पुरविणे १५ हजार, ग्रामपंचायती अंतर्गत ट्रीट लाईट दुरुस्तीसाठी साहित्य पुरविणे ९० हजार, ग्रामपंचायतसाठी मोडोकोर खरेदीसाठी ३० हजार आणि ग्रामपंचायत वझरे नळ योजना दुरुस्त करण्यासाठी एक लाख २४ हजार ९०० रुपये अंदाजपत्रकीय निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामांसाठी तीस दिवसाची मुदत आहे. दरपत्रक व निविदा मागणी अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्याचे अधिकार सरपंच यांनी राखून ठेवले आहेत.
--
आशिये ग्रामपंचायतीतर्फे निविदा
कणकवली ः आशिये (ता.कणकवली) ग्रामपंचायतीतर्फे मान्यताप्राप्त ठेकेदारांसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. आशिये येथे शालेय शौचालय सुविधा निर्माण करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ४९ हजार ३६७ रुपये मंजूर करण्यात आला आहे. निविदा अर्ज शुल्क शंभर रुपये, भयान रक्कम ५०० रुपये असून कामाची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत आहे. अटी व शर्ती ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर लावल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77330 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..