भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल
भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल

भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल
कणकवली, ता. 14 ः कलमठ मुस्लिमवाडी येथे भंगाराचे साहित्य रस्त्यावर टाकून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केल्याप्रकरणी एका भंगार व्यवसायिकावर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मधाप्पा सुब्बाराव इंगळे (रा. कलमठ) असे त्यांचे नाव आहे. याबाबत शाबीरअली दाऊद खान (वय ३९, रा. कलमठ मुस्लिमवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी हा भंगार व्यवसाय करतो. कलमठ मुस्लिमवाडी येथे घराच्या परिसरात संशयित आरोपीने प्लास्टिक कचरा, बॉटल, जुन्या गाड्यांचे स्पेअर पार्ट असे भंगार टाकून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल असे कृत्य केले आहे. खान यांनी दिल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीवर पोलिसांनी सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्या बाबत गुन्हा नोंदविला आहे.
--------
रेल्वे प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू
कणकवली, ता. 14 ः येथील उपजिल्हा रूग्णालायत कर्नाटकातील एका रेल्वे प्रवासाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शिवराम बच्चा शेट्टी (वय ६० रा. गुलुबेरी जि. उडपी) असे मृताचे नाव आहे. शिवराम शेट्टी हे पुणे एर्णाकुलम या गाडीने प्रवास करत होते. आज सकाळी सव्वासाच्या सुमारास रेल्वे स्थानकात गाडी आली असता प्रवाशांनी ही बाब स्टेशन मास्तर प्रशांत सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलीस राधेश्याम देवराम सन्नासे (वय 34) हे रेल्वेगाडी मधून शिवराम शेट्टी यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, उपचार करण्यापूर्वी त्यांच्या मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रवाशाकडीस बॅगमध्ये सापडलेल्या आधार कार्डवर ओळख पटली. त्यानंतर ही माहिती नातेवाईकांना देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77379 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top