
सिंधुदुर्गात कोरोनाचे नवीन २८ रुग्ण रुग्णसंख्येत वाढ
सिंधुदुर्गात कोरोनाचे
नवीन २८ रुग्ण
ओरोस, ता. १४ ः जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाचे आणखी २८ रुग्ण मिळाले आहेत. गेले काही दिवस रुग्ण कमी झाले असताना गुरुवारी पुन्हा रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी ८ रुग्ण बरे झाले आहेत. परिणामी, जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ७५ झाली आहे.
जिल्ह्यात जूनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने प्रवेश केला. त्यानंतर कमी झालेली रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली. एक जूनपासून गेल्या ४४ दिवसांत ३५३ रुग्ण मिळाले आहेत. एका रुग्णाचे निधन झाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत रुग्ण संख्या कमी झाली होती; मात्र गुरुवारी पुन्हा २८ रुग्ण मिळाल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, गुरुवारी मिळालेल्या रुग्णांत सर्वाधिक सावंतवाडी तालुक्यात १४ तर दोडामार्ग तालुक्यात ७ रुग्ण मिळाले आहेत. यामध्ये मिळालेल्या रुग्णात देवगड १, दोडामार्ग ७, कुडाळ १, सावंतवाडी १४, वेंगुर्ले ४, जिल्ह्याबाहेरील १ असा समावेश आहे. गुरुवारी एकूण २४५ नमुने तपासण्यात आले. एकूण रुग्ण संख्या ५७ हजार ७५३ झाली आहे. तर कोरोनामुक्त संख्या ५६ हजार १४४ झाली आहे. सक्रिय रुग्ण ७५ असून यात देवगड ४, दोडामार्ग १३, कणकवली ७, कुडाळ ९, मालवण ५, सावंतवाडी २३, वैभववाडी २ तर वेंगुर्ले ८ व जिल्ह्याबाहेरील ४ अशाप्रकारे तालुकानिहाय समावेश आहे. आतापर्यंत एकूण सहा लाख ४३ हजार ३९२ कोरोना चाचण्या जिल्ह्यात झाल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77390 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..