कॉपी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉपी बातमी
कॉपी बातमी

कॉपी बातमी

sakal_logo
By

rat१४p५३.jpg-३६१३२ रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावर बाबनदीजवळ रस्त्यावर पडलेले मोठे झाड.
------------
जगबुडी, वाशिष्ठीसह अर्जूनाचे पाणी ओसरले

चार घरांची हानी; बावनदीजवळ काजूचे झाड कोसळले
रत्नागिरी, ता. १४ ः जिल्ह्यात पावसाचा जोरे ओसरल्यामुळे जगबुडी, वाशिष्ठी, अर्जुना, कोदवलीसह काजळी नद्यांची पुरपातळी नियंत्रणात आली आहे. त्यामुळे किनार्‍यावरील नागरिकांनी निःश्‍वास सोडला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर बाबनदीजवळ महाकाय काजूचे झाड रस्त्यावर कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. गुरुवारी (ता. १४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६०.२२ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी दिवसभर पावसाचा जोर होता. खेडमधील जगबुडी तर चिपळुणातील वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली होती. गुरुवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला होता. रत्नागिरीत दुपारी अचानक पाऊस पडला. सायंकाळच्या सत्रात किनारी भागात वेगवान वारे वाहत होते. पावसामुळे सकाळच्या सत्रात अणुस्कुरा घाटात दरड कोसळली होती. मात्र, काही तासातच दरड बाजूला केली. गेले काही दिवस जिल्ह्यातील मोठ्या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीवर होती. जगबुडी नदी गेल्या आठ दिवसांत चार वेळा धोक्याच्या पातळीवर होती. प्रशासनाकडूनही सतर्कता बाळगली होती. गुरुवारी पावसाचा जोर कमी झाला. मुंबई-गोवा महामार्गावर बाबनदीजवळ एक भले मोठे काजूचे झाड रस्त्याच्या मध्यभागापर्यंत कोसळले. सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू होती. सायंकाळी बांधकामकडून झाड काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते. पावसामुळे दापोलीत तीन घरांचे तर संगमेश्‍वरात एका घराचे नुकसान नोंदले गेले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77402 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..