हडपीड स्वामी समर्थ मठातर्फे शिलाई मशिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हडपीड स्वामी समर्थ मठातर्फे शिलाई मशिन
हडपीड स्वामी समर्थ मठातर्फे शिलाई मशिन

हडपीड स्वामी समर्थ मठातर्फे शिलाई मशिन

sakal_logo
By

36243
हडपीड ः येथे शिलाई मशीनचे वाटप करताना प्रभाकर राणे, नंदकुमार पेडणेकर आदी.

हडपीड स्वामी समर्थ
मठातर्फे शिलाई मशिन
नांदगाव ः श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड यांच्यातर्फे दहीबांव दळवीवाडी येथील गरजू महिला पूजा दळवी यांना उदरनिर्वाहासाठी मठातर्फे शिलाई मशीनचे वाटप केले. त्यांचा मुलगा साहिल दळवी याला संस्थेतर्फे शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्याच्या शिक्षणाचा खर्च श्री स्वामी समर्थ मठातर्फे केला जाणार असल्याचे मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर व अध्यक्ष प्रभाकर राणे यांनी सांगितले. गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हडपीड येथील स्वामी समर्थ मठाच्यावतीने विविध समाजोपयोगी उपक्रम नियमित राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या महिलेस शिलाई मशीनचे वाटप केल्याची माहिती पेडणेकरांनी दिली. यावेळी मधुसूदन भडसावळे, दीपक आईर आदी उपस्थित होते.
--------------
36244
परुळे ः येथील शेतकरी प्रमोद परुळेकर यांना धनादेश देताना मान्यवर.

परुळेतील शेतकऱ्याला मदत
कुडाळ ः सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात मदतीच्या दृष्टीने कार्यरत असणाऱ्या राधारंग फाऊंडेशनच्यावतीने परुळे येथील शेतकरी प्रमोद परुळेकर यांना पाच हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला. यावर्षी राधारंग फाऊंडेशनकडून आर्थिक मदत मिळवणारे श्री. परुळेकर हे चौथे शेतकरी आहेत. हा धनादेश सामाजिक कार्यकर्ते संतोष सामंत यांच्या हस्ते देण्यात आला. श्री. परुळेकर यांच्या नावाची शिफारस श्री. कदम यांनी राधारंग फौंडेशनकडे केली होती. आरआरएफच्यावतीने अनेक वर्षांपासून अनंत कृषी विकास योजनेचे व्यवस्थापन करणाऱ्या सामंत यांच्याकडून मदत मिळणारा पाचवा शेतकरी लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती संस्थेचे संस्थापक रघुनाथ सरनाईक यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77508 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top