बांदेकर महाविद्यालयाचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदेकर महाविद्यालयाचे यश
बांदेकर महाविद्यालयाचे यश

बांदेकर महाविद्यालयाचे यश

sakal_logo
By

बांदेकर महाविद्यालयाचे यश
सावंतवाडी ः शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय व अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाईड आर्ट) महाविद्यालयाने स्पृहणीय यश प्राप्त केले. विद्यापीठाच्या द्वितीय वर्षांचा निकाल ९५ टक्के तर अंतिम वर्षाचा ८४ टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थी असे ः द्वितीय वर्ष ः सानिका गोरे (तृतीय), रुबेन बारदेसकर (पाचवा), ऋत्विक धुरी (सहावा) शर्वाणी शेरे (सातवा). अंतिम वर्ष ः अवनी पाटील (द्वितीय), मंदार शिरोडकर (पाचवा), आदिती उदुगडे (सहावा), रोहीत गोनवरे (सातवा). यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक प्रा. टी. एल. नाईक, प्रा. अक्षय सावंत (द्वितीय वर्ष), प्रा. तुकाराम मोरजकर, प्रा. सुयोग वेटे (अंतिम वर्ष) यांचे मार्गदर्शन लाभले. चेअरमन रमेश भाट, प्राचार्य दिलीप धोपेश्वरकर आदींनी अभिनंदन केले.
------------
कणकवलीत धोकादायक खड्डा
कणकवली ः शहरातील मुख्य चौकात सेवा रस्त्यावर पडलेला खड्डा अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. हा खड्डा बुजविण्यासाठी त्यात खडी टाकली जाते; मात्र वाहने वरून गेल्यानंतर पुन्हा खडी बाजूला होते. या समस्येची दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. सेवा रस्त्यावर पाणी साचल्यास खड्डा दिसत नाही. त्यामुळे अपघात होतात. तीच स्थिती आचरा रस्त्याकडे वळताना मुख्य चौकात आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदाराने हे काम केले असून देखभाल दुरुस्तीचे कामही त्याच्याकडे आहे. मात्र, आता दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळी डांबराचा वापर करून हे खड्डे बुजविण्याची गरज आहे. संबंधित यंत्रणांनी यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
--------
कांदळवन कत्तलप्रकरणी गुन्हा
आचरा ः डोंगरेवाडी येथे कांदळवने तोडल्याप्रकरणी कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांच्या फिर्यादीवरून पर्यावरण संरक्षण कलमांनुसार आचरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञाताने आचरा-डोंगरेवाडी (ता. मालवण) येथील कांदळवनाची कत्तल केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77566 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..