कणकवली : पारकर मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : पारकर मागणी
कणकवली : पारकर मागणी

कणकवली : पारकर मागणी

sakal_logo
By

L36309
फोटो : kan१५१.jpg
सिंधुदुर्ग : येथील जिल्‍हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना संदेश पारकर यांनी निवेदन दिले.
--------------

पुतळा स्थलांतर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा

संदेश पारकर यांची मागणी : जिल्‍हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

कणकवली, ता.१५ : कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुना पुतळा रातोरात हटविण्यात आला. तर त्याच परिसरात नवीन पुतळा बसविण्यात आला. हे दोन्ही प्रकार संशयास्पद आहेत. यात सहभागी असणारे पोलीस, नगरपंचायत प्रशासन आणि नगरपंचायतीचे लोकप्रतिनिधी यांची खातेनिहाय चौकशी व्हावी आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे.
श्री.पारकर यांनी या मागणीचे निवेदन आज जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि कणकवली पोलीस निरीक्षक यांना दिले. श्री.पारकर म्‍हणाले, पुतळा स्थलांतरण आणि नवीन पुतळा बसविल्‍याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपंचायत मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागविण्यात आली आहे. जुना पुतळा हलविण्यामध्ये किती अधिकारी, कर्मचारी सहभागी होते, या कारवाईसाठी पोलिसांना कुणी आदेश दिले होते, पुतळा हलविल्याची व नविन पुतळा बसविल्याची नोंद पोलिसांच्या दैनंदिन नोंदवहीत आहे का, नवीन पुतळा कुणी बसविला आहे, अशी माहिती मागविण्यात आली आहे. माहिती प्राप्त होताच याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.
दरम्‍यान जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्‍या निवेदनात श्री.पारकर यांनी म्‍हटले की, ७ जूलैच्या पहाटे शिवपुतळ्याच्या बाजूला एका फॅब्रिकेशन शेडमध्ये अज्ञातांनी नवीन पुतळा बसवला. याबाबत माहिती घेतली असता आमदार नीतेश राणे, कणकवली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष त्यांचे काही कार्यकर्ते पुतळा बसविताना उपस्थित असल्याचे समजले. तर ९ जूलैच्या पहाटे नगरपंचायत प्रशासन, मुख्याधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये पूर्वीचा पुतळा बेकायदेशीरपणे, तेथून हलविण्यात आला. मात्र रातोरात बसविलेल्या नव्या पुतळ्याबाबत कोणतीही कारवाई महसूल, पोलीस, नगरपंचायत प्रशासनाने केलेली नाही. म्हणजेच अधिकृत पुतळ्यावर कारवाई करून अनधिकृत पुतळ्यास संरक्षण दिले गेले. यात सहभागी असणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल होणे आवश्यक असून संबंधित शासकीय अधिकारी यांची प्रशासकीय स्तरावर चौकशी व्हावी, अशी मागणी केल्याचेही पारकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77573 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..