
आचरा नळपाणी दुरुस्तीस चार कोटींचा निधी मंजूर
आचरा नळपाणी दुरुस्तीस
चार कोटींचा निधी मंजूर
आचरा, ता. १५ ः गावच्या नळपाणी योजना दुरुस्तीसाठी अंदाजित चार कोटीच्या निधीला मंजुरी मिळाल्याने लवकरच या भागातील पाणीप्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. यासाठी प्रयत्न करणारे जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस, सरपंच प्रणया टेमकर आणि ओरोस पाणी पुरवठा उपअभियंता उदयकुमार महाजनी यांच्या प्रयत्नांना यश आल्याने आचरावासीयांकडून समाधान व्यक्त होत आहे.
किनारपट्टी लगतचा गाव असल्याने उन्हाळ्यात विहीरींच्या पाण्याची पातळी खाली गेल्यावर पाण्याचा प्रश्न गंभीर बनत होता. यापूर्वी आचरासाठी असलेली नळपाणी योजना निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बंद पडली होती. यामुळे नळयोजनेची आवश्यकता निर्माण झाली होती. या दृष्टीने जिल्हा परिषद सदस्य फर्नांडिस, सरपंच टेमकर यांनी पुढाकार घेत पाणी पुरवठा विभाग ओरोसचे उपअभियंता महाजनी यांच्या सहकार्याने चार कोटी रुपयांच्या अंदाजित नळपाणी योजनेच्या दुरुस्तीस मंजूरी मिळाली. पैकी २ कोटी ५८ लाख ९० हजार ३०० रुपयांच्या टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यात आचरा, वरचीवाडी, गाऊडवाडी, जामडूल, डोंगरेवाडी या वाडींचा समावेश असून उर्वरित भागांसाठीची टेंडर प्रक्रिया लवकरच होणार असल्याचे श्री. फर्नांडिस यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे लवकरच आचरेगावचा पाणी प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आचरा ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77575 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..