संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

-rat१५p११.jpg
L36220
ः गुहागर ः जीएचआर १२-१ दहावीच्या गुणवंतांना गौरवताना मान्यवर.
--------------
विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद
गुहागर ः दहावीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे तसेच शाळेतील शिक्षक व पालक यांनीसुद्धा विद्यार्थ्यांसाठी घेतलेली मेहनत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ दीपक कनगुटकर यांनी केले. गुहागर शहरातील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्यावतीने सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रथम क्र. प्राप्त मुद्रा चौगुले, द्वितीय श्रुती पाटणे, तृतीय विभागून तन्वी बाणे व गौरी विचारे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संदीप भोसले, शिवाजी आडेकर, सुधाकर कांबळे, दिलीप मोहिते, विलास कोरके, दीपक देवकर उपस्थित होते.
----------------------------------
-rat१५p१२.jpg
L36221
दापोली ः टांगर येथे शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
-------------
चला विद्यार्थी घडवूया उपक्रमाद्वारे
शैक्षणिक साहित्य वाटप
गावतळे ः युवा मोरया भरारी प्रतिष्ठानच्यावतीने चला विद्यार्थी घडवूया उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिरखल चिंचाळी, टांगर मराठी, हातीप, शिरसोली नं. १ चिंचाळी, विसापूर पाथरी, विसापूर खातलोली तर माणगाव तालुक्यातील निजामपूर, चापडी तळेगांव, अंगणवाडी तळेगांव येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या संस्थेमार्फत समाजातील आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे, वैद्यकीय मदत आदी अनेक उपक्रम राबवले जातात, अशी माहिती संस्थेचे मार्गदर्शक श्रीराम महाडिक व अध्यक्ष नागेश शेडगे, सचिव संजोग शेडगे, दापोली उपाध्यक्ष रवींद्र वारणकर यांनी दिली. शाळेतील शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संस्थेस मदत करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्यावतीने रवींद्र वारणकर यांनी आभार मानले.
----------
फोटो येत आहे.
-rat१५p१३.jpg ः गुहागर ः जवाहर नवोदयच्या प्रवेशपरीक्षा गुणवत्ता यादीतील ३ विद्यार्थी.
--------------
जीवन शिक्षण शाळेतील विद्यार्थ्यांचे यश
गुहागर ः जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. १ या शाळेत २०२१-२२ मध्ये जवाहर नवोदय प्रवेशपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय चालवले जाते. या विद्यालयात जिल्ह्यातील हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी प्रवेशपरीक्षा घेतला जाते. या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणे हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आवाहनात्मक असते. या शाळेतील ५ वीमधील स्वराज शिंदे, अनिकेत सावंत, सत्यजित सानप या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय परीक्षेत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक अमोल धुमाळ यांनी मार्गदर्शन केले होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गुहागर तालुक्याच्या गटविकास अधिकारी भागवत, मुकुंद कासारे, लोहकरे यांनी अभिनंदन केले तसेच शाळा व्यवस्थापन समिती जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. १ व शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77585 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top