बांद्यात उच्छाद मांडणाऱ्या माकडाच्या जेरबंदसाठी पिंजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात उच्छाद मांडणाऱ्या
माकडाच्या जेरबंदसाठी पिंजरा
बांद्यात उच्छाद मांडणाऱ्या माकडाच्या जेरबंदसाठी पिंजरा

बांद्यात उच्छाद मांडणाऱ्या माकडाच्या जेरबंदसाठी पिंजरा

sakal_logo
By

L36331

ओळ - बांदा ः येथे माकडाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे. यावेळी उपस्थित वनपाल अनिल मेस्त्री, सरपंच अक्रम खान व अन्य. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यात उच्छाद मांडणाऱ्या
माकडाच्या जेरबंदसाठी पिंजरा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः शहरात कट्टा कॉर्नर परिसरात उच्छाद मांडणाऱ्‍या माकडाला पकडण्यासाठी वन विभाग सतर्क झाला आहे. त्यासाठी बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी काल (ता. १४) माकडाने नासधूस केलेल्या सलूनच्या समोर पिंजरा बसविला आहे. लोखंडी पिंजऱ्‍यात आरसा व केळी टाकण्यात आली आहेत. बऱ्याच वेळा नुकसानी करूनही वन विभाग मात्र झोपेतच होता. आज अखेर त्यांना जाग आल्याचे दिसून आले.
बांदा कट्टा कॉर्नर परिसरात गेल्या महिन्यात सुजाता फोटो स्टुडिओचे माकडाने अतोनात नुकसान केले होते. काल सायंकाळी नाना कदम यांच्या सलून दुकानातील आरसा व अन्य साहित्याची नासधूस केली होती. नुकसान पाहणीदरम्यान बांदा वनपाल अनिल मेस्री यांनी स्थानिक व्यापाऱ्‍यांना माकडाचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज दुपारी पिंजरा लावण्यात आला. लोखंडी पिंजऱ्यात माकड जेरबंद होईल, असा विश्वास बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी व्यक्त केला. यावेळी सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, बाळू सावंत, वनरक्षक संतोष देसाई, शशिकांत देसाई, दत्तात्रय शिंदे, आत्माराम सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77602 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top