शाळकरी मुलीची छेड काढणार्‍यास पोलीसांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळकरी मुलीची छेड
काढणार्‍यास पोलीसांत
शाळकरी मुलीची छेड काढणार्‍यास पोलीसांत

शाळकरी मुलीची छेड काढणार्‍यास पोलीसांत

sakal_logo
By

शाळकरी मुलीची छेड
काढणाऱ्या‍स पोलिसांत
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः प्रशालेतील एका अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या सातार्डा येथील युवकाला बांद्यातील नागरिकांनी यथेच्छ प्रसाद देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा युवक गेले काही आठवडे प्रशालेच्या गेटवर येऊन मुलींची छेड काढत होता. संबंधित मुलींनी आपल्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. बांदा सरपंच अक्रम खान यांना या प्रकाराबाबत कल्पना दिल्यानंतर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. हा युवक प्रशालेच्या गेटवर आल्यानंतर सापळा रचत त्याला यथेच्छ प्रसाद देत बांदा पोलिसांच्या ताब्यात दिले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, जावेद खतीब, मकरंद तोरसकर, शामसुंदर मांजरेकर, ज्ञानेश्वर सावंत आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी या युवकाच्या आई-वडिलांसमवेत त्या युवकाची समजूत काढून त्याला सोडून दिले. शाळा, कॉलेजच्या ठिकाणी परिसरातील युवकांचा वावर वाढल्याच्या बऱ्याच तक्रारी आहेत. हे युवक शाळकरी व कॉलेज युवतींची छेड काढत असतात. बस स्थानकावरही हे प्रकार सर्रासपणे निदर्शनास येतात. यावर आळा घालण्यासाठी शाळकरी मुली व युवतींनी बांदा पोलिस अथवा बांदा ग्रामपंचायत सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच खान यांनी या वेळी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77605 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top