
पिंगुळीतील राऊळ महाराज मठात गुरूपौर्णिमा उत्साहात
टीपः swt१५२२.jpg मध्ये फोटो आहे.
पिंगुळी ः येथील प. पू. राऊळ महाराज मठात भक्तांची झालेली गर्दी.
पिंगुळीतील राऊळ महाराज
मठात गुरुपौर्णिमा उत्साहात
कुडाळ, ता. १५ ः पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज मठ येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. यानिमित्ताने भक्तांची मोठी उपस्थिती लाभली होती.
प. पू. राऊळ महाराज समाधी मंदिर व प. पू. अण्णा राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरात या गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले होते . यानिमित्ताने पहाटे काकड आरती, प. पू. राऊळ महाराजांच्या समाधिस्थानी अभिषेक श्री व सौ. दिलीप राऊळ यांच्या वतीने सकल भक्तांच्या कल्याणासाठी सामूहिक गाऱ्हाणे, नामस्मरण, प. पू. श्री. अण्णा महाराज समाधिस्थानी अभिषेक श्री. महादेव वसंत पांगे पादुकापूजन, श्री. प. पू. महाराजांची आरती, दुपारी महाप्रसाद, भजन, कीर्तन, सायंकाळी सप्तसूर महिला भजन मंडळ पिंगुळी यांचे भजन सादरकर्ते सुनंदा अशोक पवार व प. पू. राऊळ महाराज कुटुंबीय महिला मंडळ, सांजआरती, रात्री प. पू. महाराजांच्या पादुकांची सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा झाला. यानंतर रात्री स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ, तांबोळी बुवा अमित तांबोळकर यांचे भजन झाले. प. पू. राऊळ महाराज समाधी मंदिर व प. पू. अण्णा राऊळ महाराज समाधी मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77699 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..