पान तीन मेन-बांद्यात वीज अधिकाऱ्यांना घेराओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान तीन मेन-बांद्यात वीज अधिकाऱ्यांना घेराओ
पान तीन मेन-बांद्यात वीज अधिकाऱ्यांना घेराओ

पान तीन मेन-बांद्यात वीज अधिकाऱ्यांना घेराओ

sakal_logo
By

36394
बांदा ः महावितरणचे सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना जाब विचारताना सरपंच अक्रम खान, साईप्रसाद काणेकर, जावेद खतीब आदी.


बांद्यात महावितरणला घेराओ

खंडित वीजेमुळे अधिकारी धारेवर; समस्यांचे निराकरण न झाल्यास कार्यालयाला टाळे


सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः शहरात गेले महिनाभर वीजेचा खेळखंडोबा सुरु असल्याने संतप्त नागरिकांनी आज सकाळी सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना घेराओ घालत जाब विचारला. ग्राहकांच्या एकाही प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्यात अभियंता कोहळे अपयशी ठरले. आठ दिवसांत सर्व समस्यांचे निराकरण न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकू. प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरीही चालतील, असा गर्भित इशाराही दिला. अमाप वीज बीले आकारता मग सेवा देताना कारणे कसली देता? असा प्रश्‍नी ग्राहकांनी केला.
शहरात वीजेची गंभीर समस्या आहे. वारंवार वीज खंडीत होत असल्याने ग्राहक पुरते हैराण झाले आहेत. व्यापार्‍यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. लेखी निवेदने देऊनही महावितरणच्या कार्यपद्धतीमध्ये काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी अभियंता कोहळे यांना घेराव घालत जाब विचारला. जीर्ण वीज वाहिन्या व खांब, वाहिन्यांवरील झुडपांची सफाई न करणे यामुळे वीज खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. वीज बीले वसुलीची कामे कर्मचारी आवडीने करतात. मात्र, वीजेच्या समस्या सोडविण्यात मागे असतात, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी केला. शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर महावितरणचे कार्यालय असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांना फटका बसत आहे. हे कार्यालय शहरातच असले पाहिजे, अशी मागणी सदस्य जावेद खतीब यांनी केली. तात्काळ कार्यालय शहरात स्थलांतरित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी अधीक्षक अभियंता, सावंतवाडी उप अभियंता यांच्याशी संपर्क केला असता त्यांचे मोबाईल स्वीच ऑफ आल्याने ग्राहक आणखीनच संतप्त झाले. यावेळी अभियंता अनिल यादव उपस्थित नसल्याने सरमळे येथून आलेल्या ज्येष्ठ ग्राहकांना हात हलवित माघारी परतावे लागले. येत्या ८ दिवसात वीजेची परिस्थिती न सुधारल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. ग्राहकांच्या प्रश्नांवर अभियंता कोहळे निरुत्तर झाले होते. विनेश गवस यांनी वाफोलीतील वीज समस्या व वायरमनचा बेजबाबदारपणा याबाबत तक्रार केली. यावेळी सरपंच अक्रम खान, सदस्य जावेद खतीब, साई काणेकर, बाळू सावंत, शाम मांजरेकर, ज्ञानेश्वर सावंत, विनेश गवस, निखील मयेकर, निलेश देसाई, समीर सातार्डेकर, केदार कणबर्गी, नाना सावंत, प्रज्योत काणेकर, ओंकार नाडकर्णी, सचिन वीर, प्रथमेश गोवेकर, बिपीन येडवे, हेमंत दाभोलकर, प्रविण येडवे, प्रथमेश गोवेकर, अर्णव स्वार आदी उपस्थित होते.
-----------
बिलिंग अधिकारी धारेवर
सहाय्यक अभियंता कोहळे यांना जाब विचारताना बिलिंग विभागाचे अधिकारी श्री. चव्हाण यावेळी उपस्थित झालेत. यावेळी त्यांनी सरपंच खान यांच्याशी बोलताना त्यांचा एकेरी उल्लेख केल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत. यावेळी त्यांना देखील ग्रामस्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ग्रामस्थ संतप्त झाल्याने त्यांनी येथून काढता पाय घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77700 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top