
आईला म्हणाला, तुला माझा त्रास होणार नाही; २ दिवसांनी नायट्रोजन वापरुन आत्महत्या
सावंतवाडी : नायट्रोजन सिलिंडरचा वापर करून स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेत शहरातील माठेवाडा परिसरात राहणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज उघड झाला. जेसन गिरगोल फर्नांडिस (वय १९) असे त्याचे नाव आहे. त्याने हा प्रकार तोंडाला पिशवी बांधून त्यात पाईपने नायट्रोजन वायू सोडून केला. त्याचा मृत्यू नायट्रोजन वायू शरीरात गेल्याने गुदमरून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असले तरी नेमका मृत्यू कसा झाला, याबाबत डॉक्टरांनाही शंका आहे. त्यामुळे अधिक तपासासाठी पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. मामा जोकिम ॲन्थोनी डिसोझा (वय ४८) यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. (Sawantwadi Crime News)
हेही वाचा: गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या; घटनेनं खळबळ
जेसन सावंतवाडी माडेवाडा येथील त्याच्या मामाच्या घरी आईसह राहत होता. तो पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईतून सावंतवाडीत आला होता. आज सकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा सकाळी उशिरापर्यंत बंद होता. मामा जोकिम यांना संशय आला. त्यांनी शिडीच्या साहाय्याने छप्परातून आत पाहिले असता जेसनने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती त्यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली. साहाय्यक पोलिस निरीक्षक तौफिक सय्यद कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. जेसनने दरवाजावर ‘डेंजर कोणीही मास्कशिवाय आत प्रवेश करू नका, मी विषारी द्रव्याचा वापर केला आहे,’ अशी सूचना लिहून ठेवली होती. त्यामुळे पोलिसांनी सावध भूमिका घेत तत्काळ आपत्कालीन यंत्रणा आणि पालिका कर्मचाऱ्यांना पाचारण केले. सुरुवातीला छप्पराची कौले काढून खबरदारी घेण्यात आली. त्यानंतर पीपीई किट परिधान करून रूममध्ये प्रवेश केला. यावेळी जेसन आतील बाथरूममध्ये नायट्रोजन सिलिंडर आणि तोंडाला प्लास्टिक पिशवी बांधलेल्या अवस्थेत दिसून आला. जेसन याने बाथरूममध्ये चटई टाकून तोंडाला प्लास्टिक पिशवी बांधून त्यात नायट्रोजन सिलिंडरचा पाईप टाकला होता. डोक्याला मार बसू नये म्हणून बाथरूमच्या नळाला सॅक अडकवली होती तर पायात मोजे घातले होते.
जेसन याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना घटनास्थळी सापडली. त्यात माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये. मी स्वतःहून आत्महत्या करत असून, देवाला भेटायला जात आहे, असे लिहिले होते. पोलिसांनी चिठ्ठीसह सिलिंडर व इतर वस्तू ताब्यात घेत मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविला. जेसन याने दरवाज्यावर चिकटवलेली सूचना लक्षात घेता पोलिस उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंखे यांच्यासह निरीक्षक शंकर कोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्याने नेमकी आत्महत्या का केली, हे मात्र समजू शकले नाही.
हेही वाचा: यूपीतून १४ वर्षांच्या मुलीला मुंबईत आणले, 5 महिने केला सामूहिक बलात्कार
नायट्रोजन सिलिंडर मागविला ऑनलाईन
जेसन याचे शिक्षण सावंतवाडीत झाले. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर तो आईकडे होता; मात्र कामानिमित्त तो मुंबईत होता. आई सावंतवाडीत भावाकडे राहत होती. मुंबईत जीम ट्रेनर म्हणून तो काम करत होता. तो, पंधरा दिवसांपूर्वीच गावी आला होता. त्याने चार दिवसांपूर्वी नायट्रोजन सिलिंडर ऑनलाईन मागविला होता. मामाने त्याला विचारले असता प्रयोग करण्यासाठी तो मागविल्याचे त्याने सांगितले होते.
आधीच दिले होते संकेत
दोन दिवसांपूर्वी आईशी बोलताना त्याने, आता तुला माझा त्रास होणार नाही. मी तुला कायमचा सोडून जाणार, असेही सांगितले होते; मात्र जेसन याला कोणाचा त्रास होता का किंवा त्याला इतर काय प्रश्न भेडसावित होते, त्यामुळे त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला, याबाबत अधिक तपास केला जाणार असल्याचे तपास अधिकारी साहाय्यक निरीक्षक सय्यद यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77735 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..