
करूळ घाटात दरड कोसळली
सुधारीत
३६४०६
करूळ ः घाटात शुक्रवारी कोसळलेली दरड.
३६४०७
करूळ ः येथील घाटात शुक्रवारी कोसळलेली दरड हटविण्याचे काम सुरू होते.
करूळ घाटात दरड कोसळली
एका पाठोपाठ तीन ठिकाणी घटना; वाहतुक सुरू कण्यात यश
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १५ ः मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यामुळे करूळ घाटात आज सायकांळी चारच्या सुमारास तीन ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. घाट रस्त्यातच वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. येथील वाहतूक फोंडाघाट आणि भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे. महामार्ग प्राधिकरणाने दोन जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम तातडीने सुरू केले. त्यामुळे रात्री आठच्या दरम्यान घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.
करूळ घाट परिसरात दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्याने घाटात दरड कोसळण्यास सुरुवात झाली. करूळ तपासणी नाक्यापासून तीन किलोमीटरवर दरड कोसळली. पाठोपाठ आणखी दोन ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. घाटरस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वैभववाडी पोलिसांनी तत्काळ या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट आणि भुईबावडा घाटमार्गे वळविली. काही अवजड वाहने गगनबावडा आणि वैभववाडीत थांबविली होती. सायंकाळी सातपर्यंत एका ठिकाणी कोसळलेली दरड हटविण्यात आली होती. अन्य दोन ठिकाणच्या दरडी हटविण्याचे काम रात्री आठपर्यंत सुरू होते.
घाटात आणखी काही ठिकाणी किरकोळ दगडदेखील कोसळले आहेत. एक दोन ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यतादेखील आहे. तालुक्यात आज सकाळच्या सत्रात पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. त्यानंतर दुपारपर्यंत हलक्या सरी पडत होत्या. दुपारनंतर काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडणे असे प्रकार झाले आहेत.
बांधवाडीत रस्त्यावर झाड कोसळले
तळेरे-कोल्हापूर मार्गावरील कोकिसरे-बांधवाडी येथे सकाळी दहाच्या सुमारास रस्त्यावर झाड कोसळले. त्यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक आणि पोलिसांनी झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77763 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..