आबलोली ः कुणबी समाज गुणवंत विद्यार्थांचा 17 जुलैला सत्कार सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आबलोली ः कुणबी समाज गुणवंत विद्यार्थांचा 17 जुलैला सत्कार सोहळा
आबलोली ः कुणबी समाज गुणवंत विद्यार्थांचा 17 जुलैला सत्कार सोहळा

आबलोली ः कुणबी समाज गुणवंत विद्यार्थांचा 17 जुलैला सत्कार सोहळा

sakal_logo
By

कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थांना आवाहन

आबलोली, ता. १६ ः गुहागर तालुक्यातील कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थिनी आणि विद्यार्थांसाठी कुणबी समाजाचे लोकनेते, माजी आमदार स्व. रामभाऊ बेंडल यांच्या २८ व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. २४) जुलैला सकाळी ११ वा. कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुहागर बाजारभवनमधील लोकनेते माजी आमदार स्व. रामभाऊ बेंडल सभागृहात होणार आहे. कुणबी समाजातील विद्यार्थ्यांनी १७ जुलैपर्यंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचा फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण गुहागरचे तालुकाध्यक्ष आणि कुणबी पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र हुमणे, कुणबी समाजोन्नती संघाचे तालुका सरचिटणीस आणि कुणबी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन तुकाराम निवाते यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी गुहागर बाजारभवन शाखा कार्यालय शृंगारतळी, गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली व शाखा शृंगारतळी, शाखा हेदवी, संत तुकाराम छात्रालय यांच्याशी संपर्क साधावा. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77872 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..