पा २ सं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पा २ सं
पा २ सं

पा २ सं

sakal_logo
By

-rat१५p३.jpg
३६१९८
ः देवरूख ः अभिजित शेट्ये यांच्या जनसेवा कार्यालयाचा आरंभ नाना देवरूखकर यांच्या हस्ते करण्यात आला.
-----------------
जनसेवा कार्यालयाचा आरंभ
साडवली ः देवरूख नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष, ओबीसी सेल भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी देवरूख येथे नागरिकांना मोफत सेवा देण्यासाठी जनसेवा संपर्क कार्यालय उघडले आहे. गुरुवारी या कार्यालयाचा आरंभ करण्यात आला. देवरूख नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. ११, १२, १३ आणि १५ मधील नागरिकांना मोफत व घरपोच सेवा देण्यात येणार आहे. अनेक शासकीय सेवा, योजना, दाखले, ऑनलाइन कामे, प्रतिज्ञापत्र यांची कामे मोफत व घरपोच केली जाणार आहेत. क्रांतीनगर, नेहरू नगर, चव्हाणवाडी, रोहिदास आळी, आंबेडकर नगर, भंडारवाडी, भोईवाडी, आझादनगर, मोहल्ला, गुरववाडी, कुंभ्याचा दंड, मांडवकरवाडी, कांजिवरामधील नागरिकांना ही सेवा मोफत दिली जाणार आहे. नागरिकांनी शेट्ये, यशवंत गोपाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. आरंभप्रसंगी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
-------------
दुर्धर आजाराने ग्रासलेल्या
महिलांना आर्थिक मदत
साडवली ः देवरूख नगरपंचायतीने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना आर्थिक मदत देण्याचा निर्धार केला आहे. देवरूख शहरात (नगरपंचायत हद्दीत) ज्या महिला दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत, म्हणजेच कॅन्सर, एचआयव्ही, क्षयरोग, अर्धांगवायूने ग्रस्त असलेल्या महिलांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. अशा महिलांच्या नातेवाइकांनी देवरूख नगरपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांनी केले आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असून यामुळे अनेक महिलांना आधार मिळणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77878 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..