रत्नागिरी- आशादीप संस्थेला मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- आशादीप संस्थेला मदत
रत्नागिरी- आशादीप संस्थेला मदत

रत्नागिरी- आशादीप संस्थेला मदत

sakal_logo
By

rat16p11.jpg
36464
- रत्नागिरी : आशादीप संस्थेमध्ये आरचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, आशादीपचे दिलीप रेडकर आणि कर्मचारी.
......
एक वाढदिवस असाही..

आरएचपीचे अध्यक्ष नाकाडे यांची आशादीपला मदत
रत्नागिरी, ता. १६ : रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन (आरएचपी फाउंडेशन) या दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थेचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांनी वाढदिवसाप्रीत्यर्थ आशादीप मतिमंद मुलांचे निवासी स्वयंप्रशिक्षण केंद्राला मदत केली.
आशादीपमधील सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना दुपारचे जेवण देऊन सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा केला. अध्यक्ष सादिक नाकाडे यांचे भाऊ समीर नाकाडे, मित्र सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते. तसेच आशादीप संस्थेचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते दिलीप रेडकर, संस्थेच्या व्यवस्थापक स्मिता जडे, फातिमाहु पाटणकर, रसिका चव्हाण, नेहा कळंबटे, रेश्मा साळुंखे, विनोद पालकर, शालन पाडावे, नारायण पाटील, शुभांगी माईन, सौ. स्मिता कांबळे, दिव्यांग कर्मचारी रघुनाथ गोरे आदी उपस्थित होते. आशादीप संस्था सध्या वसतिगृहाची नवीन इमारत बांधत आहे. याकरिता संस्थेला मदतीची गरज आहे, अशी माहिती दिलीप रेडकर यांनी सादिकभाई नाकाडे यांना दिली. त्यानंतर आपल्याला शक्य तेवढी मदत करू आणि समाजात आवाहन करून जास्तीत जास्त मदत गोळा करण्याची ग्वाही दिली.
....
चौकट
वसतिगृहांना या घटकांचा पाठिंबा
आशादीप संस्थेचे वसतिगृह येथील केअरटेकर, मदतनीस यांच्या पाठिंब्यावर आणि सक्रिय योगदानावर चालते, याची जाणीव संस्था पदाधिकाऱ्यांना आहे, असेही रेडकर यांनी सांगितले. सर्वस्व अर्पून हे कर्मचारी येथे काम करत असल्याबद्दल कृतज्ञ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77881 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..