
‘उमेद’तर्फे ओझरममध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
36475
ओझरम ः वसतिगृहातील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी मान्यवर. (छायाचित्र ः एन. पावसकर)
‘उमेद’तर्फे ओझरममध्ये
शैक्षणिक साहित्य वाटप
तळेरे, ता. १६ ः उमेद फाउंडेशन सेवा परिवाराकडून ओझरम शाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे उमेद फाउंडेशनचे आभार मानण्यात आले.
यावेळी ‘उमेद’चे संस्थापक प्रकाश गाताडे, सरपंच प्रशांत राणे, तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, कासार्डेचे केंद्रप्रमुख संजय पवार, खारेपाटण केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, साळिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख गोपाळ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शिक्षण घेताना विद्यार्थांना अडचणी येऊ नयेत, यासाठी तसेच निराधार, गरीब व वंचित मुलांसाठी उमेद जाणीवपूर्वक काम करते, असे ‘उमेद’चे संस्थापक श्री. गाताडे यांनी सांगितले. यावेळी ‘उमेद’चे संस्थापक सदस्य नवीनचंद्र सनगर, राजाराम पात्रे, प्रदिप नाळे, नितीन पाटील, युवराज पचकर, विक्रम म्हाळुंगेकर, जाकीर शेख, श्रीराम विभुते, सामाजिक कार्यकर्ते बंडू राणे, तेजस साळुंखे, मुख्याध्यापिका स्नेहल कदम, विनायक जाधव आदी उपस्थित होते. उमेश फाउंडेशनने यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारल्याचे सांगून आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77889 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..