लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी भाजपचे पराडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी भाजपचे पराडकर
लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी भाजपचे पराडकर

लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी भाजपचे पराडकर

sakal_logo
By

36484
अविनाश पराडकर

लोकसभा सोशल मीडिया
अध्यक्षपदी भाजपचे पराडकर
कुडाळ, ता. १६ ः लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी भाजप पदाधिकारी अविनाश पराडकर यांची निवड महाराष्ट्र प्रभारी आशिष शेलार यांनी जाहीर केली. लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने देशभरात मजबूत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडी झाल्या.
पक्षाच्या केंद्रीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात ‘मिशन १४४’ राबविले जात आहे. लोकसभा प्रवास योजना अभियानांतर्गत ओरोस येथे भाजप नेते तथा महाराष्ट्र प्रभारी असलेल्या आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार शेलार यांनी श्री. पराडकर यांची लोकसभेच्या मुख्य संयोजकपदी नियुक्ती घोषित केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी ही नियुक्ती जाहीर केली आहे. लोकसभा प्रवास योजना अभियान यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने दोन्ही जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभेत सोशल मीडियाची प्रभावी यंत्रणा राबविण्याची जबाबदारी पराडकरांवर आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी प्रभावी राहिली असून, भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी त्यांची निवड केली होती. लोकसभेची ही विशेष जबाबदारी श्री. पराडकर यशस्वीपणे पेलतील, असा विश्वास पक्षवर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नीतेश राणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोद जठार, लोकसभा संयोजक अतुल काळसेकर, रणजीत देसाई, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, प्रभाकर सावंत, भाई सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77906 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top