फॅन्सी नंबरप्लेटवर मालवणात कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फॅन्सी नंबरप्लेटवर मालवणात कारवाई
फॅन्सी नंबरप्लेटवर मालवणात कारवाई

फॅन्सी नंबरप्लेटवर मालवणात कारवाई

sakal_logo
By

36489
मालवण ः अशा फॅन्सी नंबरप्लेटवर पोलिसांनी कारवाई केली.

फॅन्सी नंबरप्लेटवर मालवणात कारवाई
मालवण, ता. १६ ः कर्णकर्कश बुलेट चालकांवर येथील पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. सोबतच फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी व ट्रिपलसीट चालकांवरही धडक कारवाई मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.
पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस गुरुप्रसाद परब व अमित हरमलकर यांच्या माध्यमातून ही कारवाई मोहीम सुरू आहे. दुचाकीच्या नंबरप्लेट फॅन्सी स्वरुपात असतील तर त्या बदलून नियमानुसार नंबरप्लेट असाव्यात, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे परवाना नसल्यास कोणीही त्यांच्याकडे दुचाकी देऊ नये, पालकांनीही याबाबत काळजी घ्यावी. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक विजय यादव यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77912 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..