रत्नागिरी- नदीच्या पुरातून गायी वाचल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- नदीच्या पुरातून गायी वाचल्या
रत्नागिरी- नदीच्या पुरातून गायी वाचल्या

रत्नागिरी- नदीच्या पुरातून गायी वाचल्या

sakal_logo
By

rat१६p२१.jpg
L३६५१३
ः कुर्णे ः वाचवलेल्या ४ पैकी २ गायी.
....
जीवावर होत उदार सीता, राधा, मीरा व गोपींना केले नदीपार..!

चार गायींना वाचवायला ग्रामस्थांच्या पुरात उड्या; काजळीच्या लोंढ्यात वाहिल्या, ३ तास थरारनाट्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः काजळी नदीच्या पुरात अडकलेल्या चार गायींना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. या गायी सुखरूप घरी पोहोचल्या असल्या तरी त्यांना धक्का बसला आहे. एका गायीच्या पोटाला जखम होऊन बरेच रक्त गेले तर एकीच्या पोटाला टाके घालावे लागले. आता गायी हळुहळू भयातून बाहेर येत आहेत. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे व तत्पर कृतीमुळे सर्व गीर गायी मोठ्या संकटातून वाचल्या आहेत. चारही गायींच्या सुटकेचे हे थरारनाट्य ३ तासाहून अधिक काळ सुरू होते.
रत्नागिरीतील अॅंथनी यांच्या कुर्णे (ता. लांजा) येथील शेतघरातून अरुण जोशी हे सीता, राधा, मीरा व गोपी या ४ गीर गायी नदीजवळ गुरुवारी (ता. १४) चरायला घेऊन गेले होते. त्या पाण्याच्या लोंढ्यात सापडल्या. जोशी यांनी शेतघराच्या व्यवस्थापक सुगंधा कडू यांना कळवली. कडू यांनी लांजातील (करसल्लागार) सतीश चांदोरकर यांना फोन करून मदत मागितली. ते आणि कामगार रायबा जोशी धरणाजवळ गेले. राधा व गोपी आंजणारी दत्तमंदिरासमोर अडकल्या. त्यांना अरुण जोशी यांनी बघितले आणि ते व प्रभाकर गिडिये, मंगेश जाधव, सचिन गिडिये जंगलामुळे तेथे जाणे अवघड होते, तरीही वाट काढत पोहोचले. पाण्यात उडी टाकून गोपीला दोरी बांधली व पाण्याबाहेर काढले. पुनसकोंड येथील लाखण काकींनी तिला घरी सुखरूप पोहोचवले.
राधा कसरत करत नदीच्या बाहेर आली; पण जंगलामध्ये गायब झाली. दुसरी गाय एका झाडाच्या मदतीने पाण्यावर तरंगत राहिली. दोन गायी प्रवाहासोबत वाहात जात होत्या. सुगंधा कडू यासुद्धा प्रवाहाच्या समांतर बाजूने धावत जाऊन लोकांना गायीवर लक्ष ठेवायला सांगत होत्या. नंतर चांदोरकर व जोशी असुर्डे धरणाजवळ पोहोचले. तेव्हा मीरा धरणाच्या भिंतीवरच होती व तिथे पोहोचणे अशक्य होते. लगेचच पाण्याच्या प्रवाहाने तिला नदीमध्ये ओढले. हे पाहताच चांदोरकर व जोशी निवसर धरणाकडे रवाना झाले.
...
चौकट
...अन रायबा जोशींची नदीत उडी
तिसरी मीरा गाय निवसर धरणाच्या जवळ आली व डाव्या बाजूने पुढे सरकली. ती गेटबाहेर येताच जीवाची पर्वा न करता रायबा जोशी यांनी नदीत उडी मारली व दोरी गायीच्या मानेला बांधली. ग्रामस्थ अशफाक पावसकर, जावेद पावसकर आणि गावकऱ्यांनी दोरखंड, काठ्या वगैरे सर्व प्रकारची मदत करून गायीला वाचवले. अॅंथनी सुनील मोहिते व सतीश गगवे यांना घेऊन ते निवसरला पोहोचले. त्यानंतर वेरळचे डॉ. चावरे यांनी गायींवर औषधोपचार केले.
-------------------------------------------
चौकट १
नदीचे रौद्ररूप
सीता गाय असुर्डे धरणातून वाहात पाण्यात बुडत होती. मध्येच वर येत होती. ती निवसर धरणाच्या चौथ्या गेटकडे वाहत गेली. तेथे सीता तरंगणाऱ्या लाकडांमध्ये अडकल्याचे पाहिले. तोपर्यंत श्रीमती कडू यांनी निवसरच्या ग्रामस्थासोबत नदीजवळून निवसर मुसलमानवाडी गाठली. तिथल्या गावकरी, महिलांनी दोऱ्या आणल्या व जावेद पावसकर यांनी गायीला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. सर्वांच्या मेहनतीने सीताला नदीबाहेर काढण्यात आले.
...
एक नजर..
* चारही गायी अद्याप घाबरलेल्या
* कुर्णेतून वाहात गेल्या दूरवर
* एक झाडाच्या मदतीने तरंगत
* एक असुर्डे धरणाच्या भिंतीवर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77950 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top