संजीवन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली भातलावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजीवन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली भातलावणी
संजीवन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली भातलावणी

संजीवन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली भातलावणी

sakal_logo
By

rat16p20.jpg
L36501
रत्नागिरी - भातलावणी उपक्रमात सहभागी झालेले संजीवन गुरूकुलचे विद्यार्थी व शिक्षक.
----------
संजीवन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी केली भातलावण
रत्नागिरी, ता. १७ ः पटवर्धन हायस्कूलच्या गुरूवर्य रा. पु. जोग संजीवन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी भातलावणी उपक्रमाद्वारे प्रत्यक्ष भातशेती लावण्याचा अनुभव घेतला. तालुक्यातील आंबेकोंड येथे हा उपक्रम येथील प्रगत शेतकरी व माजी कृषी अधिकारी काशिनाथ बापट यांच्या शेतात प्रबंधक मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या झाला. या उपक्रमात ५ वी व ६ वीचे विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांना शेतीचे महत्व कळावे, या हेतूने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. दोन वर्ष कोरोना संकटामुळे हा उपक्रम होऊ शकला नाही; मात्र यावर्षी कोरोना संकट ओसरल्याने हा भातलावणी उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अक्षरशः शेतातील चिखलात लोळण घेऊन आपला आनंद द्विगणित केला. सुरवातीला शेतकरी काशिनाथ बापट यांनी शेतीचे महत्व तसेच शेती करण्याची पद्धत याविषयी माहिती सांगितली. या वेळी विद्यार्थ्यांनी ट्रॅक्टर नांगरणीचासुद्धा अनुभव घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांच्या मदतीने भातलावणी केली. चिखलात माखलेल्या विद्यार्थ्यांनी येथील वहाळात स्नान करत आनंद लुटला. उपक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्याराणी घडशी यांनी केले. या उपक्रमाबाबत संस्था व संगोपन समितीचे पदाधिकारी, तसेच पालकांनीही उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77951 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..