
बांद्यात रंगला आषाढ महोत्सव
36532
बांदा ः आषाढ महोत्सवाचे उदघाट्न करताना मनीष दळवी. शेजारी प्रमोद कामत, अक्रम खान, बाळा आकेरकर आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
बांद्यात रंगला आषाढ महोत्सव
आकेरकर मित्रमंडळाचा पुढाकार, उपक्रमाचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः बांदा माजी सरपंच बाळा आकेरकर मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित आषाढ महोत्सवाचा प्रारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सादर केलेल्या द्रोण-पर्व (वीर अभिमन्यू) या संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, गोगटे-वाळके कॉलेजचे विश्वस्त प्रेमानंद चुडदेसाई, सरपंच अक्रम खान, माजी उपसभापती शीतल राऊळ, रोटरी क्लब बांदाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर उर्फ भाई सामंत, कातकरी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह अध्यक्ष उदय आईर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, माजी उपसभापती विनायक दळवी, ज्येष्ठ भजनकर्मी गिरीश महाजन, बाळा आकेरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, जयसिंग राणे, नारायण गावडे आदी उपस्थित होते. यशप्राप्त विद्यार्थी युती राऊळ, साक्षी प्रभूशिरोडकर, प्राजक्ता डुगल यांना सन्मानित करण्यात आले. तसेच ''सिंधू रक्तमित्र''चे अध्यक्ष श्री. तेंडोलकर, वसतिगृहाचे अध्यक्ष श्री. आईर यांच्यासह ज्येष्ठ दशावतार कलाकार श्री. सामंत, जयसिंग उर्फ दादा राणे, सरपंच खान, जिल्हा बँक अध्यक्ष दळवी, प्रमोद कामत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सर्व उपस्थितांनी आषाढ महोत्सव व मित्रमंडळाच्या कार्याचे कौतुक केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77975 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..