
विनायक राऊत
‘बॅगेशिवाय राऊत
कार्यक्रमाला जात नाहीत’
कोल्हापूर, ता. १६ : खोकी घेणे हे मुंबईवाल्याचे काम असते. खासदार विनायक राऊत हे बॅग घेतल्याशिवाय कशालाच येत नाहीत. त्यांची ती खासियत आहे. मला येथे आंदोलने करायला लावून श्री. राऊत स्वतः कॅबिनेटमध्ये डील करत असायचे. त्यांनी माझा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी केला, अशाशब्दात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांच्यावर तोफ डागली. शिवसेनेच्या काल (ता. १५) झालेल्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष संजय पवार व खासदार राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी श्री. क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती. त्याला आज श्री. क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, ‘‘श्री. राऊत यांच्यासारखी माणसे पैसे घेतल्याशिवाय कुठे जात नाहीत. निवडणूक असेल किंवा कार्यक्रम त्यांची बॅग तयार ठेवावी लागते. ते ज्येष्ठ आहेत मात्र सगळे पक्ष सहलीप्रमाणे फिरून आलेल्यांचे ऐकून माझ्यावर टीका करत असतील तर ते शिवसेना संपवण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचा एकही शिवसैनिक शिल्लक ठेवणार नाहीत.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78057 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..