
फोटोसंक्षिप्त
L३६६०१
ओळ - कुडाळ ः अनिल गवस यांचा सत्कार करताना अरुण मर्गज व मान्यवर.
अनिल गवसांचा
कुडाळात सत्कार
कुडाळ ः परिस्थितीला शरण जाऊ नका. त्यावर मात करा. जे आवडते ते स्वीकारा व जे आवडत नाही त्याचा त्याग करा, असे प्रतिपादन ''स्वराज्य रक्षक संभाजी'' या मालिकेतील बहुचर्चित सरसेनापती हंबीरराव मोहिते फेम बांदा गावचे सुपुत्र अनिल गवस यांनी केले. येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बॅ. नाथ पै महिला महाविद्यालयाचे व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बी.एडचे प्राचार्य परेश धावडे, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य मीना जोशी, उपप्राचार्य कल्पना भंडारी, सीबीएससी बोर्ड सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे, पत्रकार नीलेश मोरजकर, प्रशांत गवस आदी उपस्थित होते. यावेळी श्री. गवस यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणाली मयेकर, प्रास्ताविक मर्गज, तर उपस्थितांचे आभार प्रा. सुमन करंगळे-सावंत यांनी मानले.
.................
प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी
प्रवेशासाठी २१ पर्यंत मुदतवाढ
सावंतवाडी ः राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची मुदत २१ पर्यंत वाढवली आहे.
सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणेः ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करण्यासाठी २१ जुलै, तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे २३ पर्यंत, तर तक्रार निवारणसाठी २३ ते २५ व अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे २६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. कॅपच्या विविध फेऱ्यांकरिता विकल्प अर्ज भरणे, जागावाटप, जागा स्वीकृती करणे, उमेदवाराने वाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे, प्रवेशाची अंतिम तारीख इत्यादी बाबतचे पुढील वेळापत्रक अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर घोषित केले जाईल आणि ते संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक सावंतवाडी येथे तंत्रशिक्षण विभागाचे अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. गजानन भोसले यांनी केले आहे. कॉलेजमध्ये एकूण पाच अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यांचे चॉईस कोड पुढीलप्रमाणेः सिव्हिल इंजिनिअरिंग (३४७०१९११०), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (३४७०६१२१०), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (३४७०२९३१०), कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (३४७०२४५१०), मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग (३४७०९९७१०). यासोबतच आर्थिक दुर्बल (EWS) प्रवर्गासाठीचा अतिरिक्त कोटाही शासनातर्फे वाढविण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर EWS प्रमाणपत्रासह संस्थेमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
.................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78118 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..