
टुडे पान १ साठी)
शिवसेना चिन्ह वापरा
....
दक्षिण रत्नागिरीत लाखाहून अधिक सदस्य नोंदणी
शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी; साळवींसह जिल्हा प्रमुखांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः राज्यात शिवसेना पक्षांतर्गत आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेने पुन्हा सदस्य नोंदणीचे अभियान राज्यभरात सुरू केले आहे. शनिवारी (ता. १६) सायंकाळी झालेल्या दक्षिण रत्नागिरीतील चार तालुक्यांच्या बैठकीत एक लाख सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी पक्षात राहिलेल्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार काम करावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी केले आहे.
शिवसेनेच्या रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील कार्यालयात बैठक झाली. यावेळी रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या चार तालुक्यांच्या तालुकाप्रमुखासह प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारी सदस्य उपस्थित होते. महिन्याभरापूर्वी शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या बंडानंतर राज्यभरात शिवसेनेकडून पक्षाची ताकद पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील जिल्हाप्रमुखांच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियान राबविण्याची सूचना देण्यात आली होती. सर्व जिल्हाप्रमुखांना आपल्या जिल्ह्यात सदस्य नोंदणी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेकडून रत्नागिरीत बैठकीचे आयोजन केले होते. प्रत्येक तालुक्यातून २५ हजार तर दक्षिण रत्नागिरीतून एक लाखाहून अधिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट दिले आहे. महिनाभरात सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची सूचना जिल्हाप्रमुख चाळके यांनी दिली. शिवसेना पक्षाशी प्रामाणिक असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे ही माहिती हाती घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.
---
चौकट
जुन्या शिवसैनिकांवर भिस्त
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री तथा आमदार उदय सामंत हे शिदेंच्या गटात सामील झाल्यामुळे याठिकाणी सभासदा नोंदणीची धुरा तालुकाप्रमुख बंड्या साळवी, ज्येष्ठ सदस्य उदय बने, मंगेश साळवी यांच्यासह जुन्या शिवसैनिकांवर राहणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78141 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..