टुडे पान १ साठी) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान १ साठी)
टुडे पान १ साठी)

टुडे पान १ साठी)

sakal_logo
By

टुडे पान १ साठी)
-rat17p11.jpg,
L36649
...
rat17p12.jpg
L36650
- राजापूर ः रानमाळावर सापडलेली अळंबी
------------
अळंबी मिळविण्यासाठी रानमाळ पालथा

राजापुरात रानभाज्यांसह अळंबीला मागणी; वाढते प्रतिकारशक्ती
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ ः पावसाने हिरवागार झालेल्या डोंगररांगा आणि शेतशिवारात नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्‍या विविध प्रकारच्या रानभाज्या बहरल्या आहेत. यामध्ये विविध जीवनसत्व व पोषक घटक असलेली रानकारली, गुळवेल, भुईआवळा, शेवगा, टाकळा यांसारख्या अनेक भाज्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या नियमित बाजारात भाज्यांचे दर भडकलेले असताना स्वस्त आणि मस्त त्यातच, विषमुक्त असलेल्या रानभाज्यांसह नैसर्गिकरित्या मिळणारे अळंबी मिळविण्यासाठी ग्रामस्थांकडून जंगल परिसर आणि रानमाळ पालथा घातला जात असल्याचे दिसत आहे.
पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या शेताच्या बांधावर व रानावनात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात. काही दिवसांमध्ये या रानभाज्यांना बहर येतो. रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असल्याने त्यावर इतर पालेभाज्यांप्रमाणे कोणतेही विषारी किटकनाशक वा रासायनिक खताची फवारणी केलेली नसते. त्यामुळे या भाज्यांवर किटकनाशके वा रासायनिक खतांचा अंश नसतो. चवीला रूचकर आणि पौष्टीक असलेल्या या रानभाज्या विषमुक्त आणि रोगमुक्तही असतात.
---------------
चौकट
अळंबीसाठी वेळ साधण्याची धडपड
जादा पाऊस झाल्यास जंगल परिसरामध्ये अळंबीची उगवण जास्त प्रमाणात होते. जंगल परिसरामध्ये जमिनीतून उगवणाऱ्‍या या अळंबीच्यां ठिकाणांबाबत काही मोजक्या लोकांना माहिती असते. त्यामध्ये विशेष करून स्थानिक आणि जंगलामध्ये वावर असणाऱ्‍या लोकांना माहिती असते. सकाळच्यावेळी अळंबी उगवणीचा बहर असल्याने त्या मिळविण्यासाठी सकाळची ‘नेमकी वेळ’ साधण्याची माहितीगारांसह त्यांच्या सोबत्यांची धडपड अनेकवेळा पहायला मिळते. काही माहितगार तर नेमकी वेळ साधण्यासाठी ज्या ठिकाणी अळंबी उगवते, त्या ठिकाणी पहाटेच जावून मुक्काम ठोकताना दिसतात.
--------
चौकट
मशरूमचे औषधी गुणधर्म :
1. मधुमेही व्यक्तींकरिता उपयुक्त : मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. अशा प्रकारच्या अन्नाची गरज मधुमेही व्यक्तींना असते. मशरूममध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक आहेत.
2. मूत्रपिंड (किडनी) रोग्यांचा जीवनकाळ वाढविण्यास उपयुक्त.
3. लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम अन्न : कमी उर्जेचा आहार, वजन कमी करण्याकरिता उत्तम असतो. मशरूम मध्ये कमी उर्जा, प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय पदार्थ असतात. हा आहार लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम आहे.
4. स्कर्व्ही रोगापासून बचाव : मशरूममध्ये क’ जीवनसत्त्व असते. मशरूमचे नियमित सेवन केल्यास स्कर्व्ही रोगापासून बचाव होऊ शकतो.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78142 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top