
फोटोसंक्षिप्त
''आंबोली, चौकुळ, कुंभवडेतील
विजेच्या समस्या दूर करा''
सावंतवाडीः वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली, चौकुळ व कुंभवडे या तिन्ही गावातील विजेची समस्या तत्काळ दूर करा. आवश्यक त्या ठिकाणी वायरमन नेमा. वीजखांब, वाहिन्या बदला, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी वीज कंपनीचे अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे. त्याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, वर्षा पर्यटनात आंबोलीत मोठी गर्दी असते; मात्र गेले काही दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे त्या ठिकाणी वीजपुरवठा अनेक दिवस खंडित आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. तेथील हॉटेल व्यावसायिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांच्या तक्रारी लक्षात घेता त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. परिणामी तत्काळ यावर निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करा. आवश्यक ठिकाणी वीजवाहिन्या बदला तसेच वायरमन बदला, अशी मागणी त्यांनी केली आहे.
.................
L36638
ओळ - सावंतवाडी ः माधव विदयालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतीकामांचा आनंद लुटला.
माधव विदयालयाची
मुले रमली शेतीत
सावंतवाडी ः येथील (कै). लक्ष्मीबाई मुरारी माधव विदयालय आदर्श पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळा नं. ६ भटवाडी या शाळेत ''बळीराजासाठी एक दिवस'' उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना शेतीविषयी माहिती मिळावी, शेतीची अवजारे, बियाणी, खते याविषयी प्रत्यक्ष माहिती देण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भटवाडी येथील शेतकरी मोहन गावडे यांच्या शेतीला भेट देत माहिती जाणून घेतली. सर्वांनी प्रत्यक्ष शेतीकामांचा अनुभव घेतला. माजी नगरसेविका दीपाली भालेकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. तर गावडे मॅडम, देऊ गावडे, मोहन गावडे कुटुंबियांनी सहकार्य केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सायली लांबर, उपशिक्षिका गीता सुतार यांनी सर्वांचे आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78157 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..