शिंदे-फडणवीस सरकार औंटघटकेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे-फडणवीस सरकार औंटघटकेचे
शिंदे-फडणवीस सरकार औंटघटकेचे

शिंदे-फडणवीस सरकार औंटघटकेचे

sakal_logo
By

L३६६३४

- जयेंद्र परुळेकर

शिंदे-फडणवीस सरकार औंटघटकेचे
डॉ. जयेंद्र परुळेकर ः केसरकरांकडून कबुलायतदार प्रश्नी दिशाभूल
सावंतवाडी, ता. १७ ः शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य आहे. घटनेनुसार मंत्रिमंडळ हे कमीत कमी १२ मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यामुळे हे सरकार औंटघटकेचे ठरणार आहे. आंबोली, गेळे कबुलायतदार गावकर प्रश्न सोडविणार असल्याचे सांगून आमदार दीपक केरसरकर आंबोली, चौकुळवासीयांची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे नमूद केले आहे की, फंदफितुरी आणि बंडखोरी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार घात करून पाडण्यात आले. नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोनच मंत्र्यांचे शपथविधी झाले. या गोष्टीला आता दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. तरीही अजून मंत्रिमंडळाचा पत्ताच नाही. राष्ट्रपती निवडणुकीचे कारण पुढे करून वेळ मारून नेली जात आहे. खरे तर शिंदे-फडणवीस सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार आहे. मंत्रिपदाच्या वाटपावरून मोठे वाद होत आहेत. हेच मंत्रिमंडळ स्थापनेतील विलंबामागील खरे कारण आहे, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील जनतेत या सर्व प्रकाराची उलटसुलट चर्चा होत आहे. संपूर्ण देशात हा एक हास्यविनोदाचा आणि थट्टेचा विषय झाला आहे. महाराष्ट्रासारख्या औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या देशात अग्रेसर असलेल्या राज्याच्या उज्ज्वल राजकीय परंपरेचा एक तमाशाच मांडलेला दिसून येत आहे. रात्रीच्या अंधारात वेषांतर करून षड्यंत्राने बनवलेले हे दोन मंत्र्यांचे घटनाबाह्य सरकार औंटघटकेचे ठरणार, हे आता जनसामान्यांना देखील समजले आहे, अशीही टिकाही त्यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78158 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..