रत्नागिरी-हातखंबा गटातून निवडणूक लढविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-हातखंबा गटातून निवडणूक लढविणार
रत्नागिरी-हातखंबा गटातून निवडणूक लढविणार

रत्नागिरी-हातखंबा गटातून निवडणूक लढविणार

sakal_logo
By

राष्ट्रवादी चिन्ह वापरा
-------------
हातखंबा गटातून निवडणूक लढविणार

रामभाऊ गराटे; राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना चेहरा
रत्नागिरी, ता. १७ ः आगामी काळात ओबीसी आरक्षणविना होणाऱ्‍या निवडणुकीत हातखंबा-पाली जिल्हा परिषद गटातून उभे राहणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ गराटे यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख असून याच गटामधुन पूर्वी त्यांनी दोनवेळा जिल्हा परिषदेत नेतृत्व केले होते.
ओबीसी समाजाचा अनुभवी प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्यामुळेच पूर्ण ताकदीने आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ते रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपदी कार्यरत आहेत. हातखंबा, पाली जिल्हा परिषद गटामध्ये २००२ ते २०१२ या कलावधीत दोन वेळा जिल्हा परिषदेत निवडून गेले होते. शांत आणि संयमी कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. आमदार उदय सामंत यांचे ते एकेकाळी निकटवर्तीय म्हणूनच ओळखले जायचे; परंतु सामंत राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्यानंतरही गराटेंनी पक्ष बदलला नव्हता. समाजातील बांधवांसह हातखंबा गटात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे गराटे यांनी निवडणुकीत उभे राहण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हातखंबा गटाच्या समस्या, अडचणी व विकासाच्या दृष्टीने आवश्यक विकासकामांची माहिती असल्याने आता निवडणूक लढविणार आहोत. सध्या ओबीसी आरक्षण लागू नसल्याने या प्रवर्गातून ज्येष्ठ लोकप्रतिनिधीला संधी देण्याची मागणी आता अनेक कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे; मात्र आरक्षण पडले तर त्याला अनुकूल उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
---
चौकट
गराटेंपुढे मोठे आव्हान
शिवसेनेचे माजी मंत्री आमदार उदय सामंत हे पालीवासीय असल्यामुळे त्यांच्या ‘होमपिच’वर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करणे रामभाऊ यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. याठिकाणी सामंत यांचे सध्याचे निकटवर्तीय बाबू म्हाप यांचा बोलबाला आहे. ओबीसी आरक्षणाचा अजूनही निर्णय झालेला नाही. महिला किंवा अनुसूचित जाती जमाती आरक्षण पडले नाही, तर गराटे यांच्यापुढे रिंगणात उतरल्यानंतर मोठे आव्हान राहू शकते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78198 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top