रत्नागिरी- एसटी कामगारांचे नेते रमेश केळकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- एसटी कामगारांचे नेते रमेश केळकर यांचे निधन
रत्नागिरी- एसटी कामगारांचे नेते रमेश केळकर यांचे निधन

रत्नागिरी- एसटी कामगारांचे नेते रमेश केळकर यांचे निधन

sakal_logo
By

-rat17p14.jpg
L36644
- रमेश केळकर
-------------
एसटी कामगारांचे नेते रमेश केळकर यांचे निधन

रत्नागिरी, ता. १७ : एसटी कामगारांचे नेते आणि रत्नागिरी आगारातील वाहतूक नियंत्रक रमेश गोविंद तथा भाई केळकर (वय ५६) यांचे निधन झाले. गेले काही महिने ते आजारी होते. एसटी कामगारांच्या पाच महिने झालेल्या संपामध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला. आंदोलनातून त्यांनी माघार घेतली नाही आणि सर्व कामगारांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळेच त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी जिल्ह्यातून कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. केळकर यांचे मूळ गाव भोके. ते एसटीमध्ये सुरवातीला वाहक म्हणून रुजू झाले. त्यानंतर विविध परीक्षा देत ते वरच्या पदावर पोहोचले. कामगारांचे दुःख त्यांना माहिती होते. त्यांनी एसटी कामगारांच्या काम बंद आंदोलनात कोकणाची जबाबदारी सांभाळली. सर्व कामगारांना धीर दिला. प्रसंगी अनेकांना धान्यरूपी मदत आणि आर्थिक मदतही केली. त्यांच्या निधनाने कामगारांनी शोक व्यक्त केला. केळकर मागे पत्नी, मुले, सून असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78199 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..